Pathan: 'पठाण' भारताला आईसमान मानतो

Pathan: शाहरुख खान 4 वर्षानंतर पुन्हा पडद्यावर आगमन करणार असल्याने त्याचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. दरम्यान, शाहरुखने पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी चित्रपटाविषयी महत्वाचे वक्तव्य केले आहे.
Pathan
Pathan Dainik Gomantak
Published on
Updated on

Pathan: बॉलीवूडच्या किंग खानचा अर्थात शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट पठाण 25 जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. शाहरुख खान 4 वर्षानंतर पुन्हा पडद्यावर आगमन करणार असल्याने त्याचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. दरम्यान, शाहरुखने पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी चित्रपटाविषयी महत्वाचे वक्तव्य केले आहे.

मी 32 वर्षांपासून अॅक्शन हिरो बनण्याचे स्वप्न बघत आहे आणि ते आता पठाणच्या माध्यमातून पुर्ण होत आहे.असे शाहरुख खानने म्हटले आहे. 32 वर्षापुर्वी मी एक अॅक्शन हिरो बनण्यासाठी या बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आलो होतो. मात्र मी रोमॅंटिक हिरो बनलो. आजही माझे डीडीएलजेवर प्रेम आहे. राहुल, राज अशी सगळी चांगली मुले मला आवडतात. परंतु मी नेहमीच हा विचार करत होतो की मला अॅक्शन हिरो व्हायचे आहे. ते स्वप्न आता पठाणच्या माध्यमातून पुर्ण होत आहे.

पठाणच्या भुमिकेबद्दल बोलताना शाहरुखने म्हटले आहे की, पठाण हा एक साधा मुलगा आहे. मला वाटतं तो खोडकर आहे. तो टफ आहे पण त्याचा तो दिखावा नाही करत . तो विश्वासू आहे आणि प्रामाणिकसुद्धा आहे. पठाण एक असा मुलगा आहे जो भारताला आपल्या आईसमान मानतो.

Pathan
Throwback Photo: फोटोत दिसणाऱ्या या क्युट मुलीने गोविंदा अन् सलमानसोबत दिलेत हिट चित्रपट, ओळखलंत का?

पठाण चित्रपटातल्या दिपिकाच्या भुमिकेबद्दल बोलताना शाहरुखने म्हटले आहे की, दिपिकाच या भूमिकेला 100 टक्के न्याय देऊ शकते. या चित्रपटात एक अशी मुलगी हवी होती, जी एका मुलाबरोबर मारामारी करु शकेल . त्याचबरोबर ,बेशरम गाण्याचा सिक्वेल करु शकेल . असे अनोखे कॉम्बीनेशन फक्त दिपिकामध्येच आहे आणि दिपीकाने या भुमिकेला न्याय दिला आहे. यशराज फिल्मने शाहरुखचा हा व्हिडिओ रिलिज केला आहे.

याआधी दिपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांनी चेन्नई( Chennai) एक्सप्रेस, ओम शांती ओम आणि हॅपी न्यू इअरसारखे ब्लॉकबास्टर चित्रपट एकत्र केले आहेत. पठाण चित्रपट चित्रपटगृहात येण्याअगोदरच या चित्रपटातील गाणी आणि टिझरने धुमाकुळ घातला आहे. चाहते चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. 25 जानेवारीला हा चित्रपट हिंदी, तेलगु, तमिळमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com