Nargis Death Anniversary: संजय दत्तने आईच्या आठवणीत शेअर केले काही क्षणचित्रे

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) नर्गिस यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
sanjay dutt| Nargis Death Anniversary
sanjay dutt| Nargis Death AnniversaryDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस यांचा आज स्मृतीदिन. 3 मे 1981 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1942 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमन्ना या चित्रपटामधून नर्गिस यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. नर्गिस यांच्या 'अंदाज', 'आग', 'बरसात', 'श्री 420', 'चोरी चोरी', 'मदर इंडिया' या चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. अलीकडेच नुकतेच संजय दत्तने (Sanjay Dutt) नर्गिस यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Sanjay Dutt latest news)

संजय दत्तने (Sanjay Dutt) त्याच्या आईचे म्हणजेच नर्गिस यांचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो खाली लिहिले "असा एकही क्षण गेला नाही जेव्हा मला तुझी आठवण आली नसेल. तु माझ्या आयुष्याचा पाया आहेस. तसेच तु माझी शक्ती देखील आहेस. जर तु माझ्या मुलांना आणि पत्नीला भेटली असतीस तर त्यांना देखील तुझा आशीर्वाद आणि प्रेम मिळालं असतं. मी तुला आज मिस करत आहे. मला तुझी रोज आठवण येते."

sanjay dutt| Nargis Death Anniversary
Panchayat Season 2: 'पंचायत'चा नवा सीझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

संजय दत्तच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. एका यूजरने पोस्टाला 'लेजेंड'अशी कमेंट केली आहे. संजयच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या 'संजू' या चित्रपटामध्ये देखील नर्गिस आणि संजय यांच्यामधील बाँडिंग दिसते. काही दिवसांपूर्वी संजयचा 'केजीएफ-2' हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com