Sanjay Dutt: शाहरुख अन् संजय दत्त दिसणार एकत्र? जवान चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका

Sanjay Dutt: रा वन सिनेमात संजूबाबाने शाहरुख सोबत पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
Sanjay Dutt and Shahrukh Khan
Sanjay Dutt and Shahrukh KhanDainik Gomantak

Sanjay Dutt: शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफीसचे सगळे रेकॉर्ड तोडत मोठे यश कमावले आहे. पठाण चित्रपट प्रदर्शित होण्याआधी वादामुळे आणि नंतर चित्रपटामुळे शाहरुख खान बराच चर्चेत राहिला. आता जवान चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख पून्हा चर्चेत आला आहे.

आता जवान चित्रपटात शाहरुखबरोबर संजय दत्तदेखील दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. शाहरुख आणि संजय दत्त पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

2007 साली आलेल्या ओम शांती ओम सिनेमातल्या एका गाण्यात संजय आणि शाहरुख खानने एकत्र काम केले होते. याशिवाय 2012 ला आलेल्या रा वन सिनेमात संजूबाबाने शाहरुख सोबत पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

Sanjay Dutt and Shahrukh Khan
Satish Kaushik Death: मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण! पैसे द्यावे लागू नयेत म्हणून माझ्या पतीनेच ....

जवानचे दिग्दर्शक atlee आधी 'पुष्पा' फेम अभिनेता अल्लू अर्जुनला जवान साठी कास्ट करत होते. पण अल्लू अर्जुनने जवान मध्ये काम करण्यास नकार दिला. आता अल्लू अर्जुन नंतर दिग्दर्शक atlee संजय दत्तला कास्ट करण्याच्या विचारात आहेत.

संजय दत्त सध्या काश्मीरमध्ये आहे. संजुबाबा थलपथी विजय स्टारर 'लिओ' चे शूटिंग करत आहे, पण तो लवकरच मुंबईला परतणार असून शाहरुख खानची( Shahrukh- khan ) भेट घेणार असल्याचं समजतंय. याशिवाय संजूबाबा सध्या हेरा फेरी 3 सिनेमाचं शूटिंग सुद्धा करणार आहे.

जवान हा एक अॅक्शन एंटरटेनर असल्याचं म्हटलं जात आहे. जून 2023 मध्ये जवान प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com