Vijay Deverakonda चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये भाईजानसह अनेक दिग्गज कलाकार सहभागी!

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान दक्षिणेतील कलाकार विजय देवरकोंडा यांच्या आगामी 'लाइगर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थित होता.
Vijay Deverakonda |Salman Khan
Vijay Deverakonda |Salman Khan Instagram
Published on
Updated on

दाक्षिणात्य दिग्गज अभिनेता विजय देवरकोंडा सध्या आपल्या आगामी चित्रपट Liger च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ज्यासाठी विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री अनन्या पांडे देशातील विविध शहरांना भेट देऊन आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. दरम्यान, विजय दक्षिण सिनेमाचा मेगा स्टार चिरंजीवीच्या आगामी 'गॉडफादर' चित्रपटाच्या सेटवर पोहोचला, जिथे तो बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता सलमान खानसोबत दिसला. (Salman Khan At Liger Promotion)

लिगरच्या प्रमोशनमध्ये सलमान खान दिसला

निर्माता चार्मी कौर, मुख्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि 'लिगर' (Liger) चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ मेगास्टार चिरंजीवीच्या बहुप्रतिक्षित 'गॉडफादर' चित्रपटाच्या सेटवर पोहोचले. मुंबईतील (Mumbai) एका अनोख्या सेटवर 'गॉडफादर' क्रू एका खास गाण्याचे चित्रीकरण करत होते. ज्यामध्ये भारताचे सुपरस्टार चिरंजीवी आणि सलमान खान एकत्र नाचणार आहेत. 'गॉडफादर'च्या सेटवर जेव्हा त्यांनी त्यांची भेट घेतली, तेव्हा मुंबईत त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या 'लिगर'च्या टीमने त्यांच्या चित्रपटाच्या आगामी रिलीजसाठी स्टार्सचे आशीर्वाद घेतले. या सर्वांचा एकत्र एक फोटो व्हायरल झाला आहे.

Vijay Deverakonda |Salman Khan
Vidya Balan देणार गोड बातमी? व्हिडिओमध्ये दिसला बेबी बंप

लिगर या दिवशी रिलीज होणार आहे

मोहन राजा दिग्दर्शित आणि कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी आणि सुपर गुड फिल्म्स निर्मित 'गॉडफादर' हा चित्रपट (Movie) राजकीय थ्रिलर अॅक्शनपट आहे. हा चित्रपट 2019 मल्याळम चित्रपट 'Lucifer' चा रिमेक आहे. विजय देवरकोंडा स्टारर 'लिगर' बद्दल, हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे, लीगरचा ट्रेलर पाहिल्यानंतर, चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com