Salman Khan: दिग्दर्शक ए. आर. मुरुगादास अन् बॉलीवूडचा भाईजान करणार धमाल!

Salman Khan: ए आर मुरुगादास यांच्याबरोबरचा हा अॅक्शन चित्रपट असणार आहे.
Salman Khan
Salman KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Salman Khan: बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान प्रेक्षकांसाठी नवीन चित्रपट घेऊन येणाच्या तयारीत आहे. सलमान खान त्याच्या ईदला रिलीज झालेल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. मात्र, गेल्या वर्षी ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेला 'किसी का भाई किसी की जान' काही विशेष करू शकला नाही आणि आता 2024 च्या ईदच्या दिवशी सलमान त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. मात्र २०२५ च्या ईदला त्याचा नवीन चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.

पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये धमाल करायला तयार आहे. असे म्हटले जात आहे की, सलमान खान प्रसिद्ध दिग्दर्शक एआर मुरुगादास आणि साजिद नाडियादवाला यांच्यासोबत चित्रपटात काम करणार आहे. ए आर मुरुगादास यांच्याबरोबरचा हा अॅक्शन चित्रपट असणार आहे.

गेल्या वर्षी सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट फ्लॉफ ठरलेला असतानाच वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित झालेला 'टायगर 3' हा चित्रपटही फारशी जादू निर्माण करू शकला नाही. आता सलमान 2025 मध्ये चित्रपट रिलीजची तयारी सुरू करणार आहे.

गेल्या 30 वर्षांत सलमानने नाडियादवालासोबत 'जीत', 'जुडवा', 'हर दिल जो प्यार करेगा', 'मुझसे शादी करोगी' आणि 'किक' सारखे चित्रपट केले आहेत. या दोघांचा शेवटचा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झालेला 'किक' होता.

साजिदने या चित्रपटाची जबाबदारी ए.आर. मुरुगादॉस या दिग्गज दिग्दर्शकांच्या खांद्यावर दिली आहे, जो एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.

आता असे म्हटले जात आहे की 2024 मध्ये हा चित्रपट विविध देशांत शूट केला जाईल. पोर्तुगाल आणि इतर युरोपीय देशांमध्ये याचे शूटिंग होणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट जवळपास 400 कोटी रुपयांमध्ये बनणार असल्याचे बोलले जात आहे.

'गजनी'सारखे चित्रपट बनवलेला मुरुगदास पहिल्यांदाच सलमान खानसोबत काम करणार आहे. आता हा चित्रपट कमाल कऱणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com