Bigg Boss 17 Promo: बिग बॉसच्या घरात सतत ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत असतात. मात्र गेल्या दोन दिवसांपासून घरातील चित्र बदलल्याचे पाहायला मिळाले होते. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक, ईशा आणि समर्थ यांच्यात जोरदार भांडण होताना दिसत होते. यातच समर्थने वारंवार अभिषेकच्या मानसिक स्थितीवर भाष्य करत त्याला त्रास दिला होता. अभिषेकने समर्थच्या कानाखाली मारल्याचेदेखील एपिसोडमध्ये दाखवण्यात आले होते.
आता समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये समर्थच्या कानाखाली मारल्यासाठी अभिषेकला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर दुसऱ्या एका प्रोमोमध्ये सलमान समर्थ आणि ईशाला ओरडताना दिसत आहे.
अभिषेक कुमारला बाहेर काढल्यापासून चाहते X वर संतापले होते. त्याने अभिषेकला शोमध्ये परत आणण्याची मागणी तर केलीच पण त्याला भडकवल्याबद्दल समर्थ जुरेल आणि ईशा मालवीय यांनाही फटकारले. सलमान येताच त्याने ईशा आणि समर्थला कडक शब्दात सुनावले होते. आता असे म्हटले जात आहे की अभिषेकला शोमध्ये परत आणले आहे.
निर्मात्यांनी 6 जानेवारीच्या एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये सलमान खान चुकीसाठी अभिषेकला दोष देत आहे, परंतु असेही म्हणत आहे की ईशा आणि समर्थने अशी परिस्थिती निर्माण केली आहे. सलमान म्हणाला, 'अभिषेक चुकीचा आहे. 100% चुकीचे आहे. पण ज्याने त्याला तिथपर्यंत आणलं त्याची काहीच चूक नाही ना? तोंडात टिश्यू पेपर टाकणे, ब्लँकेंट त्याच्या अंगावर टाकणे, हे सगळे तुम्ही लोक बघत होता.
समर्थला कोणी रोखण्याचा प्रयत्न का केला नाही? ईशा, जर तू अभिषेक असतीस आणि समर्थांनी तुला हे केले असते तर तू काय केले असते?दरम्यान, आता यानंतर बिग बॉसच्या घरात कोणते नवीन वळण येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.