Arbaaz Khan: 'सलीम खान- हेलेन यांच्या लग्नानंतर...'- अरबाज खानचा मोठा खुलासा

Arbaaz Khan: सलीम खान आणि हेलेन यांच्या लग्नाचा त्याच्यावर काय परिणाम झाला होता, याबद्दल खुलासा केला आहे.
Arbaaz Khan
Arbaaz KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Arbaaz Khan: बॉलीवूड अॅक्टर आणि प्रोड्युसर अरबाज खान आपल्या'द इंविंसिबल्स'या शोमुळे सध्या चर्चेत आहे. द इंविंसिबल्समध्ये अरबाज चित्रपट जगतातल्या अनेक दिग्गज कलाकारांशी बोलत आहे.

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये तो त्याची सावत्र आई हेलेन यांच्याशी बोलताना दिसत आहे. यादरम्यान हेलेन यांनी अनेक खुलासे केले आहेत.

या शोमध्ये हेलेन या सलीम खान आणि त्यांच्या लग्नाबद्दल बोलताना दिसल्या होत्या .आता अरबाजने दिलेल्या एका मुलाखतीत सलीम खान आणि हेलेन यांच्या लग्नाचा त्याच्यावर काय परिणाम झाला होता, याबद्दल खुलासा केला आहे.

अरबाज खान( Arbaaz Khan )ने म्हटले आहे की, त्याच्या वडीलांचे अर्थात सलीम खान यांचे दुसरे लग्न स्विकारणे कठीण होते. आम्ही भावंडे तरुण होतो. तो काळ माझ्या आईसाठी सर्वात जास्त कठीण काळ होता.

मात्र यामुळे आमच्या संगोपणात कोणताही बदल झाला नाही. आम्ही आधीपासूनच चांगले आयुष्य जगत होतो. माझ्या वडीलांनी सन्मानाने दुसरे लग्न केले आणि हेलेन यांना आमच्या आयुष्यात आणले असे अरबाजने म्हटले आहे.

Arbaaz Khan
'हा माझा रंग आहे, मी माझं आयुष्य या रंगासोबतच जगले आहे अन् या रंगासोबतच मरेन'- असं का म्हणाली Nandita Das

दरम्यान, द इंविंसिबल्स या शोमध्ये हेलेन यांनीदेखील आपल्या लग्नाबद्दल बोलताना म्हटले होते की सलीम खान यांनी हेलेनला एका चित्रपटात भूमिका दिली होती. त्यानंतर आमची मैत्री झाली.

1981 जेव्हा माझे आणि सलीम यांचे लग्न झाले तेव्हा तो काळ तुमच्यासाठी कठीण असणार, खासकरुन तुझ्या आईसाठी. मात्र मला वाटते नशीबाने मला तुमच्याजवळ आणले. मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत. सलीम( Salim Khan ) यांना त्यांच्या परिवारापासून मला दूर करायचे नव्हते, असेही हेलेन यांनी म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com