Kareena-Saif ने आपल्या मुलाचे नाव जहांगीर ठेवण्यावर सबाने केले मत व्यक्त

ट्रोलरना सणसणीत उत्तर देत ती म्हणाली की पालकांशिवाय इतर कोणालाही बाळासाठी निर्णय घेण्याचा अधिकार नाही.
 Saif Ali Khan
Saif Ali KhanDainik Gomantak
Published on
Updated on

सैफ अली खान आणि करीना कपूर ( Kareena-Saif )यांनी आपल्या मुलाचे नाव जहांगीर ठेवण्याबाबत सैफ अली खानची बहीण सबाने आपले मत व्यक्त केले. ट्रोलरना सणसणीत उत्तर देत ती म्हणाली की पालकांशिवाय इतर कोणालाही बाळासाठीचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही.

सबा अली खानने तिचा भाऊ (brother), अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) यांनी त्यांच्या लहान मुलाचे नाव जहांगीर हे सर्वांसमोर आणले आहे. ती म्हणाली की पालकांशिवाय इतर कोणालाही मुलाच्या नावाचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. इन्स्टाग्रामवर, सबाने करीनाचे मालदीव सहलीमधील एक जुना फोटो शेअर केला आहे.

 Saif Ali Khan
Neha Kakkar च्या 'काटा लगा' गाण्यामुळे रोहनप्रीत सिंग झाला ट्रोल

सबा ने पोस्टला कॅप्शन दिले, "मम्मा एन जान जे. जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला तिच्यामध्ये वाढवते आणि त्याला त्याचे आयुष्य देते फक्त तिला आणि वडिलांना त्या बाळाच्या बाबतीत निर्णय घेण्याची परवानगी आहे. बाळ कसे वाढवायच हे कुटुंबातील सदस्यांसह इतर कोणीही, आनंदाने सुचवू शकतात, प्रत्येक गोष्टीवर आपले म्हणणे असू शकते! पण फक्त पालकांचा त्या बाळावर हक्क आहे. विचार करा प्रत्येकाने त्याचा आदर करावा.

 Saif Ali Khan
'हिंदी मीडियम' फेम अभिनेत्री सबा कमरवर पाकिस्तानात अटकेची कारवाई

"लव्ह यू भाब्स एन बेबी जेह." या पोस्टवर प्रतिक्रिया देताना चाहत्यांनी जेहवर प्रेम केले आणि सबाला पाठिंबा देखील दिला. एक चाहता म्हणाला, "जहांगीर हे एक सुंदर नाव आहे. लोक फक्त त्यावर टीका करतात." "पर्शियन भाषेत जहांगीर म्हणजे जगाचा राजा आणि अलीकडच्या काळात दोन जहांगीरनी भारताचा गौरव केला आहे, जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा आणि होमी जहांगीर भाभा," दुसऱ्या एका चाहत्याने टिप्पणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com