Song Trailor
Song Trailor Dainik Gomantak

'RRR' मधील धमाकेदार गाण्याच्या टीझरने वाढवली सिनेप्रेमींची उत्सुकता

काही सेकंदांच्या टीझरमध्ये ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि आलिया भट्ट 'फुल ऑन अ‍ॅक्शन'मध्ये दिसत आहेत.
Published on

एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'आरआरआर'मध्ये प्रथमच ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि आलिया भट्ट एकत्र दिसणार आहेत. या सर्व सुपरस्टार्सना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यातच निर्मात्यांनी चित्रपटाच्या आगामी गाण्याचा टीझर शेअर करून सिनेप्रेमींची उत्सुकता वाढवली आहे.

Song Trailor
एकटेपणामुळे मला आले होते डिप्रेशन: जॅकलिन फर्नांडिस

काही सेकंदांच्या टीझरमध्ये ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि आलिया भट्ट 'फुल ऑन अ‍ॅक्शन'मध्ये दिसत आहेत. सेलिब्रेशन अँथममध्ये तिन्ही स्टार्स देसी लूकमध्ये आहेत. एकीकडे ज्युनियर एनटीआर आणि राम चरण (Ram Charan) कुर्ता पायजमामध्ये देशभक्तीच्या रंगात रंगलेले आहेत, तर दुसरीकडे आलिया भट्ट दक्षिण भारतीय लूकमध्ये झळकते.

Song Trailor
तुमचं मन खंबीर असेल तर तुम्ही The Kashmir Files जरूर बघावा

संपूर्ण गाणे 14 मार्च रोजी दुपारी 4 वाजता प्रदर्शित होणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट 25 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे (Movie) आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com