अर्जुन रेड्डी, गीता गोविंदम, डिअर कॉम्रेड यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या दमदार अभिनयामुळे, विजय देवरकोंडा (Viajy Deverkonda) दाक्षिणात्य सिनेसृष्टीत चांगलाच प्रसिद्ध आहे. हिंदीत पदार्पणासाठी विजय तयारी करत होता. अखेर त्याचा फुल अॅक्शनपॅक लायगर चित्रपट (Liger Film Review) सिनेमागृहात आज प्रदर्शित झाला आहे. विजय देवरकोंडा, अनन्या पांडे (Ananya Pande), राम्या कृष्णन आणि रोनित रॉय यासरख्या तगड्या कलाकारांना या चित्रपटात अभिनय केला आहे.
लायगर चित्रपटात (Liger Film) विजय देवरकोंडाच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा आहे. पण, फिल्मची स्टोरी एवढी प्रभावी नसल्याचा सूर काही प्रेक्षकांध्ये आहे. फिल्म बॉक्सिंग वरती आधारित असून, बॉक्सिंग शिकण्यासाठी तो कसा प्रयत्न करतो याबाबत फिल्म भाष्य करते. मग, अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा (Ananya Pande And Vijay Deverkonda) यांचे लव्हस्टोरी, विजय देवकोंडा याची हालाकीची परिस्थीती यात त्याला बॉक्सिंग शिकण्यासाठी करावा लागणारा स्ट्रगल लायगर मध्ये दाखविण्यात आला आहे.
पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शिन केले आहे. तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषेत लायगर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे चांगले प्रमोशन करण्यात आले, मात्र, पहिल्या दिवशी चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट किती पंसत पडतो, तसेच, किती बॉक्स ऑफिस कलेक्शन करतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.