Jersey film
Jersey filmDainik Gomantak

....म्हणून Jersey आणि KGF 2 ची टक्कर टळली

'जर्सी' या महिन्यात 14 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार होता.
Published on

शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्या 'जर्सी' चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 22 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी एक निवेदन जारी करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. (Release date of Shahid Kapoor's Jersey film postponed)

Jersey film
Alia-Ranbir Wedding: रणबीरसोबत लग्नाच्या चर्चांवर आलियाचा पूर्णविराम

चित्रपट निर्माते अमन गिल म्हणाले, "एक टीम म्हणून आम्ही 'जर्सी'मध्ये आमचे रक्त, घाम आणि अश्रू गाळले आहेत आणि म्हणूनच हा चित्रपट तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचावा अशी आमची इच्छा आहे. जर्सी आता 22 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे."

Jersey film
अर्जुन कपूरवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायकाने दिले सडेतोड उत्तर

KGF 2 आणि Beast यांच्यात टक्कर
'जर्सी' या महिन्यात 14 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार होता. यश आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांचा आगामी चित्रपट 'KGF Chapter 2' आणि विजय स्टारर 'Beast' देखील याच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉक्स ऑफिसवर (Box Office) या तीन चित्रपटांमध्ये टक्कर होणार होती.

'जर्सी' हा तेलुगू सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याची माहिती आहे. हा चित्रपट एका 36 वर्षीय व्यक्तीवर आधारित आहे ज्याला सहा वर्षांचा मुलगा आहे. तो पुन्हा क्रिकेट खेळू लागतो. अल्लू अरविंद प्रस्तुत, अमन गिल, दिल राजू आणि एस नागा वामसी निर्मित, या चित्रपटाचे दिग्दर्शन गौथम तिन्ननुरी यांनी केले आहे. या चित्रपटात (Movie) शाहिद व्यतिरिक्त मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर सारखे स्टार्स देखील दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com