Raveena Tondon: रवीनाच्या अडचणी वाढणार; वाघाच्या जवळ जाऊन फोटोशूट करणे पडणार महागात

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे रवीना टंडनच्या अडचणीत वाढ होउ शकते.
Raveena Tondon
Raveena TondonDainik Gomantak

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tondon) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच प्रवासाचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. पण अलिकडेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याच्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

रवीना टंडनने नुकतचं वाघाचा एक व्हिडीओ (Video) आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती वाघाच्या जवळ जाताना दिसत आहे. कॅमेऱ्याच्या शटरचा आवाज क्लिपमध्ये ऐकू येतो आणि राखीव भागात एक वाघ तिच्याकडे पाहून डरकाळी फोडत असतो.

तिचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल झाला असून तिच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, वन उपविभागीय अधिकारी (एसडीओ) धीरज सिंह चौहान यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनंतर या व्हिडीओची चौकशी सुरू केली आहे.

यासोबतच, 22 नोव्हेंबरला रवीना तिच्या कारमध्ये वाघापर्यंत पोहोचली होती. हे पाहिल्यानंतर आता या अधिकाऱ्याने चालक आणि तेथे ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस देऊन त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

Raveena Tondon
The Kashmir Files Controversy: 'द कश्मीर फाइल्स'च्या वादादरम्यान विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; बनवणार 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड'

रवीनाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवासाचे फोटो शेअर केले आहेत. तिने वाघांचे काही फोटो (Photo) आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

रवीनाने या महिन्याच्या सुरुवातीलाच एक ट्विट (Tweet) केले होते. तिच्या या ट्विटनंतर भोपाळ येथील वन विहार राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी उद्यानातील वाघांच्या आवारात दगडफेक करणाऱ्या काही अज्ञातांच्या विरोधात तपास सुरू केला आहे. अशातच रवीनाने स्वतःचा हा व्हिडीओ शेअर केल्याने ती आता अडचणीत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com