Ratna Pathak Shah: तुम्ही 3 महिन्याचे बाळ आहात का? कोणावर अन् का भडकल्या रत्ना पाठक शाह

Ratna Pathak Shah: आपल्या खऱ्या आयुष्यातदेखील रत्ना पाठक शाह अशाच असलेल्या दिसून येतात.
Ratna Pathak Shah
Ratna Pathak ShahDainik Gomantak
Published on
Updated on

Ratna Pathak Shah: बॉलीवूड अभिनेत्री रत्ना पाठक शाह अभिनयाबरोबरच आपल्या बेधडक वक्तव्यासाठीदेखील ओळखली जाते. अलिकडेच त्यांची हॅप्पी फॅमिली कंडीशन्स अप्लाय वेबसीरीज रिलिज झाली होती. त्यात त्यांनी गुजराती महिलेची भूमिका साकारली होती.

हेमलता ही व्यक्तीरेखा बेधडक बोलणारी, जिला दिखावेपणाशी काही घेणेदेणे नाही अशी आहे. आपल्या खऱ्या आयुष्यातदेखील रत्ना पाठक शाह अशाच असलेल्या दिसून येतात. अशातच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत त्या स्टार सेलेब्रिटींचा क्लास घेताना दिसत आहेत.

Ratna Pathak Shah
Viral Video: ऑस्कर विजेत्या ‘नाटू-नाटू’ गाण्यावर थिरकल्या टेस्लाच्या कार, पाहा व्हिडिओ

फिल्म कॅम्पेनियनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, स्टार्स आपल्या असिस्टंटवर खूप अवलंबून असतात. स्वताची कॉफी स्वता घेऊ शकत नाहीत इतके ते आपल्या असिस्टंटवर अवलंबून असतात असे रत्ना पाठक शाह यांनी म्हटले आहे.

मी कित्येकदा विमानात पाहिले आहे. अॅक्टर स्वताची कॉफी स्वता मागवू शकत नाहीत. त्यांचे असिस्टंट कॉफी आणतो, ते एक सिप पितात आणि पून्हा कप असिस्टंटकडे देतात. तुम्ही कोण आहात? तुम्ही 3 महिन्याचे बाळ आहात का? मला हे खूप खतरनाक वाटते.

माझ्या भावाबहिनींनो काहीतरी विचार करा, आयुष्य यापेक्षा मोठे आहे. असेही रत्ना पाठक शाह यांनी म्हटले आहे. स्टार्सच्या या दिखावेपणाच्या नादात ते आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर असे वागतात. असेही त्यांना म्हटले आहे.

दरम्यान, रत्ना पाठक शाह यांचा हा व्हिडिओ सोशल मिडिया( Social Media )वर चांगलाच व्हायरल होताना दिसत असून त्याच्यावर काही सेलेब्रिटीदेखील आपली सहमती दर्शवताना दिसत आहे. सिंगर बेनी दयाल यांनी कंमेट करुन त्यांच्या या वक्तव्यावर सहमती दर्शवली आहे. मला जोपर्यत मदतीची गरज नसते तोपर्यत मी माझे काम स्वताच करतो असे त्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com