समंथा रुत प्रभू आणि पुष्पा फेम रश्मिका मंदन्ना या अभिनेत्री जरी साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय असल्या तरी त्यांचं फॅन फॉलोईंग देशभरात आहे.
दोघींच्या अभिनय आणि सौंदर्याचे चाहते असणारे प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांनाही गर्दी करतात. सध्या साऊथ इंडस्ट्रीत एका नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
समंथा सध्या तिच्या उपचारासांठी अमेरिकेत काही दिवसांकरता असणार आहे. आपल्या उपचारासाठी आपण ब्रेक घेत असल्याचंही समंथाने काही काळापूर्वी सांगितलं होतं. आपले सगळे प्रोजेक्ट पूर्ण करुन समंथाने उपचारांसाठी अमेरिका गाठली आणि सोशल मिडीयावर चर्चा सुरू झाल्या.
पिंकविलाच्या वृत्तानुसार दिग्दर्शक राहुल रवींद्रनच्या आगामी चित्रपटात समंथाच्या जागी आता रश्मिकाला कास्ट करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. अशा बातम्या समोर येत असल्या तरी अजूनही चित्रपटाची अधिकृत घोषणा नाही.
चित्रपटाची खात्रीलायक माहिती मिळाली नसली तरीही राहुल रवींद्रनने एका अभिनेत्रीसोबत आगामी प्रोजेक्टवर काम करत असल्याची अपडेट मिळाली आहे. दिग्दर्शकाने या प्रोजेक्टसाठी रश्मिका मंदान्नाची निवड केल्याची अफवा आहे.
समंथाचा शेवटचा थिएटरमध्ये रिलीज झालेला कुशी हा विजय देवरकोंडा सहकलाकार होता. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही साधारणपणे अनुकूल प्रतिसाद मिळाला.
अभिनेत्री राज-डीकेच्या सिटाडेलच्या इंडियन रिमेकच्या प्रोजेक्टमध्ये देखील काम करणार आहे. समंथाचा चाहते तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.