Ranveer-Deepika: 'या' चित्रपटातील गाण्यावर एकत्र थिरकणार 'राम-लीला'

सुपरस्टार रणवीर सिंगच्या 'सर्कस' चित्रपटातील पहिले गाणे 'करंट लगा रे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Deepika Padukone and Ranveer Singh
Deepika Padukone and Ranveer Singh Dainik Gomantak

बॉलिवूडमधील सुपरस्टार रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'सर्कस'मधील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटिस लवकरच येणार आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला आहे. रणवीरच्या 'सर्कस'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. बॉलिवूडची डिंपल क्विन दीपिका पदुकोण 'सर्कस'मधील एका गाण्यात कॅमिओ करताना दिसणार असल्याचे या चित्रपटाच्या ट्रेलरवरून समजले आहे. 'सर्कस' मधील 'करंट लगा रे' या पहिल्या गाण्याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

  • रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचे गाणे लवकरच रिलीज होणार

रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) 'सर्कस'चा ट्रेलर 2 डिसेंबरला रिलीज झाला आहे. चित्रपटासोबतच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचे गाणेही सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सर्कसच्या 'करंट लगा रे' नावाच्या या गाण्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.

आज चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे कारण रणवीरने या गाण्याची रिलीज डेट जाहीर केली आहे. 'सर्कस' मधील 'करंट लगा रे' या गाण्याचा प्रोमो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हे गाणे 8 डिसेंबर म्हणजेच गुरुवारी रिलीज होणार आहे. रणवीर सिंगच्या पोस्टनंतर चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

Deepika Padukone and Ranveer Singh
Aryan Khan च्या बॉलीवुड डेब्यू साठी स्टार्सचा कौतुकांचा वर्षाव

रणवीर सिंगच्या 'सर्कस' चित्रपट विनोदी मसाला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग पहिल्यांदाच डबल रोल प्ले करतांना दिसणार आहे. या चित्रपटात (Movie) रणवीर सिंग व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस, अभिनेता वरुण शर्मा यांच्यासह अनेक सर्व कलाकार असणार आहेत. रणवीर सिंगचा सर्कस येत्या 23 डिसेंबरला म्हणजेच ख्रिसमसच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com