Rani Mukherji On OTT
Rani Mukherji On OTTDainik Gomantak

Rani Mukherji: राणीने मुलीचा वाढदिवस दणक्यात केला साजरा; शिल्पा म्हणाली...

Rani Mukherji: आदिराच्या वाढदिवसाच्या पार्टीची थीम ख्रिसमस होती.
Published on

Rani Mukherji: बॉलीवू़डचे कलाकार कोणत्या ना कोणत्या काऱणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटामुळे, कधी त्यांच्या वक्तव्यामुळे कधी त्यांच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे तर कधी त्यांच्या घरी असलेल्या कार्यक्रमामुळे बॉलीवूडचे कलाकार चर्चेत असतात.

आता हे राणी मुखर्जीने तिच्या मुलीचा वाढदिवस दणक्यात साजरा केला आहे. तिच्या वाढदिवसाला बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

शाहरुख खानसोबत करण जोहरही आपल्या मुलांसोबत पार्टीत दिसला. शिल्पा शेट्टीही तिचा मुलगा विआन आणि मुलगी समिषासोबत आदिराच्या बर्थडे पार्टीत पोहोचली होती. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर राणी मुखर्जीच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. आदिराचा जन्म 9 डिसेंबर 2015 रोजी झाला असून ती 8 वर्षांची आहे.

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राने यशराज स्टुडिओमध्ये आदिराच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी आणि स्टार किड्स दिसले होते. शिल्पा शेट्टीने राणी मुखर्जीचे वर्णन सर्वोत्कृष्ट पार्टी थ्रोअर म्हणत तिचे खूप कौतुक केले. या पार्टीत आलिया भट्ट आणि नील नितीन मुकेश देखील उपस्थित होते.

Rani Mukherji-Shilpa Shetty
Rani Mukherji-Shilpa ShettyDainik Gomantak

मुलगी आदिराच्या वाढदिवसाच्या पार्टीत राणी मुखर्जीने लाल रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर शिल्पा शेट्टीने पिवळ्या रंगाचा टॉप आणि जीन्स परिधान केली होती. आदिराच्या वाढदिवसाच्या पार्टीची थीम ख्रिसमस होती आणि त्यात एक मोठा ख्रिसमस ट्री देखील होता, ज्याच्या जवळ राणी आणि शिल्पा शेट्टी पोज देताना दिसल्या.

राणी आणि आदित्यच्या मुलीच्या पार्टीत शाहरुखही पोहोचला. शाहरुख कॅमेऱ्यात कैद झाला नसला तरी यशराज स्टुडिओच्या बाहेर त्याची गाडी नक्कीच दिसल्याचे म्हटले जात आहे. आदिराच्या वाढदिवसाच्या पार्टीत करीना कपूरची मुले तैमूर आणि जेह देखील दिसले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com