Rani Mukerji: राणीची जादू कायम; बॉलीवूडला मिळाले चांगले संकेत

Rani Mukerji: लॉकडाऊननंतर बॉलीवूडमध्ये मीडबजेट चित्रपट फ्लॉफ होण्याचे प्रमाण वाढले आहे.
Rani Mukerji
Rani Mukerji Dainik Gomantak
Published on
Updated on

Rani Mukerji: बॉलीवूडची लाडकी आणि गुणी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणी मुखर्जी आपल्या सहज आणि उत्तम अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकत असते. अलिकडच्या काही चित्रपटांमध्ये राणीने आपली वेगळीच प्रतिमा तयार केली आहे. ती ज्याप्रकारे काम करत आहे ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून राणीचे तिच्या चित्रपटांसाठी कौतुक केले जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे ची कहानीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून राणीने आपली जादू कायम ठेवल्याचे दिसून येत आहे.

मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे हा चित्रपट 17 मार्चला जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा तू झूठी मै मक्कार हा चित्रपट चांगली कमाई करत होता. त्यातच 30मार्चला अजय देवगणचा भोला हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफीसवर कॉम्पिटेशन सुरु होते. मात्र तरीही मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे ने आपला प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवत एक यशस्वी चित्रपट ठरला.

  • 'मिसेज चैटर्जी वर्सेज नॉर्वे' चे कलेक्शन 

तीन आठवड्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर 30 करोडपेक्षा जास्त कमाई केली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार जगभरात या चित्रपटाने 33 कोटी तर भारतात 22 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. दरम्यान, 25 कोटीच्या बजेटमध्ये तयार झालेल्या चित्रपटाची कमाई बघता हा एक नफा मिळवून देणारा चित्रपट ठरला असल्याचे म्हटले जात आहे.

Rani Mukerji
Rashmika - Vijay Deverakonda : "रश्मिका आणि विजय देवरेकोंडा लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये? रश्मिकाने शेवटी सांगितलंच
  • बॉलीवूडसाठी चांगले संकेत

लॉकडाऊननंतर बॉलीवूडमध्ये मीडबजेट चित्रपट फ्लॉफ होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र अशाच चित्रपटांमधून राजकुमार राव आणि आयुष्यमान खुराना यांनी प्रसिद्धी मिळाली आहे. लॉकडाऊनच्या आधी सलग 8 चित्रपट बॉक्स ऑफीसवर य़शस्वी ठरलेल्या आयुष्यमान खुरानाचे लॉकडाऊननंतर सलग 4 चित्रपट फ्लॉफ ठरले आहेत.

दरम्यान, राजकुमार रावचा 2018मध्ये प्रदर्शित झालेला स्त्री हा शेवटचा य़शस्वी चित्रपट होता. त्यानंतर त्याचे सलग 4 चित्रपट फ्लॉफ ठरले आहे. चित्रपटाच्या ट्रेंडचा विचार करता प्रेक्षकांनी आता वेगळ्या धाटणीच्या कथा असलेल्या चित्रपटांना पसंदी देण्यास सुरुवात केली आहे. राणीच्या मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वेला प्रेक्षकांची पसंदी मिळणे हे बॉलीवूडसाठी चांगले लक्षण मानले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com