Ranbir Kapoor On Paternity Leave : "रणबीर कपूर का घेतोय 6 महिन्यांचा ब्रेक"? तू झूठी मै मक्कार नंतर घेणार विश्रांती

अभिनेता रणबीर कपूर आता 6 महिन्यांचा ब्रेक घेत आहे
Ranbir Kapoor
Ranbir KapoorDainik Gomantak

Ranbir Kapoor On Paternity Leave: अभिनेता रणबीर कपूर इंडस्ट्रीचा एक वेगळा चेहरा आहे. त्याने आतापर्यंत सर्व प्रकारच्या भूमीका केल्या आहेत. 'अजब प्रेम की गजब कहाणी' मधल्या प्रेम पासुन ते रॉकस्टार मधल्या जॉर्डनपर्यंत रणबीर कपूरने हे सिद्ध केले आहे की तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे.

ब्रह्मास्त्र आणि शमशेरा सारख्या चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिसवर कल्ला केलेला हा अभिनेता आता सुट्टीवर जाणार आहे. रणबीर कपूर लव रंजनच्या तू झुठी में मक्कर या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 

नुकत्याच एका मुलाखतीत रणबीरने संवाद साधला आहे त्यात तो म्हणतो, आता हा माझा शेवटचा रोमॅंटिक चित्रपट असेल कारण आता मी म्हातारा झालो आहे. तू झूठी मै मक्कार या चित्रपटात मी केलेली भूमीका आतापर्यंतच्या भूमीकांपेक्षा वेगळी असणार आहे असंही रणबीर म्हणाला.

“मला वाटते की मी भाग्यवान आहे तू झुठी मैं मक्कर सह, शेवटी आयुष्य पूर्ण झाले आहे की मी खऱ्या ब्लू रोम-कॉमचा एक पार्ट झालो आहे. मला वाटते की मी माझ्या कारकिर्दीत जे काही रोम-कॉम केले आहेत, ते पूर्ण चित्रपटासारखे वाटले नाही.

 लव (दिग्दर्शक लव रंजन) आणि मी चर्चा करायचो की आपण प्रेक्षकांना कोणती भावना देऊ इच्छितो, आपल्याला त्यांना सिनेमात एक उबदार आणि आनंदी अनुभूती द्यायची आहे, त्यांनी छान वेळ घालवायचा आहे, हसायला हवे आहे, रोमान्स अनुभवायला हवा आहे.

Ranbir Kapoor
Kangana Ranaut supports Nawaz: "तुम्ही बोललात बरं झालं शांतता प्रत्येकवेळी ठीक नसते"! नवाजुद्दीनसाठी कंगना मैदानात

, भावूक व्हा, थोडे शिकून घ्या आणि शेवटी खूप उबदार आणि छान भावनेने थिएटर सोडा. जेव्हा मी थिएटरमध्ये जातो तेव्हा मला ही भावना आवडते, आम्ही खरोखरच ती भावना प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही यशस्वी झालो. या रोम-कॉमचा एक भाग असल्याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे,” रणबीर म्हणाला.

यानंतर रणबीरने सांगितले की, मला आता 6 महिने कोणतेही काम करायचं नाही, मी पितृत्व रजेवर जायचं आहे. मुलगी राहासोबत वेळ घालवायचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com