Sanjay Leela Bhansali चा रणबीर अन् आलियाबाबत मोठा खुलासा, म्हणाले बालपणासूनचं या दोघांनी...

याआधीही 'ब्लॅक' चिटपटामध्ये आलिया आणि रणबीरने एकत्र काम केले होते.
alia bhatt and Ranbir Kapoor
alia bhatt and Ranbir KapoorInstagram /@aliaabhatt
Published on
Updated on

बॉलीवुड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र काम करतांना दिसणार आहे. खऱ्या आयुष्यातही दोघेही बऱ्याच दिवसापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी यापूर्वी एकत्र काम केले आहे. संजय लीला भन्साळी यांनी या दोघांबद्दल सांगितले की आलिया 9 वर्षांची असतांना रणबीरसोबत चित्रपटामध्ये काम केले आहे.

* संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी सांगितले, जेव्हा आलिया 9 वर्षांची होती, तेव्हा माझ्या घरी ती ब्लॅकमधील चिमूरडीच्या भूमिकेसाठी ऑडिशन देण्यासाठी आली होती. मी माझ्या कास्टिंग डायरेक्टरला तिला न घेण्यास सांगितले. कारण मला दुसऱ्या चित्रपटामध्ये (Movie) आलिया घ्यायचे होते. कारण आलियामध्ये एक खास गोष्ट होती.

alia bhatt and Ranbir Kapoor
Poonam Pandey : माझा पती मला दारू पिऊन मारायचा

* रणबीर कपूरसोबत ब्लॅक चित्रपटामध्ये केले काम

भन्साळी म्हणाले, 'मी त्या मुलीकडे पाहत राहिलो आणि ती माझ्याकडे पाहत राहिली.' संजय म्हणाले, मी तिला डोला रे डोला रे डोलावर डान्स करायला सांगितले कारण मला पहायचे होते की तिच्यात नायिका बनण्याचे गुण कीती आहे. ती माझ्यासमोर रंगांची उधळण करत आली आणि मी तिला रणबीर कपूरसोबत काम करायला लावल जो त्यावेळी मला "ब्लॅक" चित्रपटामध्ये असिस्ट करत होता. गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई सुरू आहे. आलिया आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये रणबीरसोबत काम करतांना दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले असून चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com