Rishi Kapoor: 'क्या तुमने कभी किसी से प्यार किया?' म्हणत बॉलीवुड कलाकारांचा ऋषी कपूर यांना हटके अंदाजात ट्रिब्यूट

आमिर खान, करीना कपूर, आलिया भट्ट , रणबीर कपूरसह अनेक बॉलीवुड कलाकारांनी ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना दिले हटके अंदाजामध्ये ट्रिब्यूट
Bollywood Actors dance on om shanti om
Bollywood Actors dance on om shanti omDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट शर्माजी नमकीन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिवंगत ऋषी कपूर आज सुद्धा चाहताच्या आठवणीत आहेत. ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल 2020 रोजी निधन झाले. बॉलीवुड अभिनेता आमिर खान, करीना कपूर, आलिया भट्ट , रणबीर कपूरसह अनेक बॉलीवुड कलाकारांनी ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना हटके अंदाजामध्ये ट्रिब्यूट दिले आहे.

ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या 'कर्ज' या चित्रपटामधील 'ओम शांती ओम' (Om Shanti Om) या हिट गाण्यावर (Song) अनेक कलाकारांनी डान्स करून त्यांना हटके अंदाजामध्ये ट्रिब्यूट दिलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ (Video) बॉलीवुड अभिनेता फरहान अख्तरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या गाण्यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, आमिर खान, अर्जुन कपूर, विकी कौशल, आधार जैन, तारा सुतारिया, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसत आहे. 'शर्माजी नमकीन' (Sharmaji Namkeen) या चित्रपटाचे दिग्दर्शक फरहान अख्तर आहे. आज हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर (OTT) प्रदर्शित होणार आहे.

Bollywood Actors dance on om shanti om
Meena kumari Death Anniversary: मीना कुमारींच्या मृत्यूनंतर नर्गिस दत्त का होत्या चर्चेत, वाचा हा किस्सा..

काही दिवसांपूर्वी 'शर्माजी नमकीन' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर या चित्रपटाचे उर्वरित शूटिंग परेश रावल यांनी पूर्ण केलं आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री जुही चावलाने देखील मुख्य भूमिका साकारली आहे. 'शर्माजी नमकीन' या चित्रपटामध्ये (Movie) सोहेल नैय्यर, तारुक रैना, सतीश कौशिक, शीबा चड्ढा आणि ईशा तलवार हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com