Ramayna Teaser: प्रफुल्लित रुप, डोळ्यात तेज! 'रामायण'चा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज, प्रभू रामांच्या रुपात रणबीर कपूरचा लूक व्हायरल; चाहते मंत्रमुग्ध VIDEO

Ranbir Kapoor Lord Ram First Look: भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानल्या जाणाऱ्या नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटाची पहिली अधिकृत झलक अखेर प्रेक्षकासमोर आली.
Ranbir Kapoor Lord Ram First Look
Ramayna TeaserDainik Gomantak
Published on
Updated on

Ramayna Teaser Video: भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानल्या जाणाऱ्या नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटाची पहिली अधिकृत झलक अखेर प्रेक्षकासमोर आली. हनुमान जन्मोत्सवाच्या पवित्र मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, यामध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत अतिशय प्रभावी रुपात दिसत आहे. मंगळवारी लॉस एंजेलिसमध्ये या चित्रपटाची पहिली झलक दाखवण्यात आली असली, तरी गुरुवारी डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा टीझर प्रदर्शित करत निर्मात्यांनी भारतीय चाहत्यांना मोठी भेट दिली.

या टीझरमध्ये प्रभू रामाला केवळ एक योद्धा म्हणून नाही, तर सर्व समस्यांचे निवारण करणाऱ्या एका 'रक्षका'च्या रुपात सादर करण्यात आले आहे. "गेल्या 5000 वर्षांपासून जे लोकांच्या हृदयावर राज्य करत आहेत," अशा शब्दांत रामाचा महिमा यात वर्णन केला. टीझरमधील एका दृश्यात रणबीर कपूरवर (Ranbir Kapoor) फुलांचा वर्षाव होताना दिसत असून त्याचा सात्विक आणि तेजस्वी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. नितेश तिवारी आणि निर्माते नमित मल्होत्रा हे 'रामायण' दोन भागांत प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. प्राइम फोकस स्टुडिओज, DNEG आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती अत्यंत भव्य स्तरावर केली जात आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना रणबीर कपूर भावूक झाला. तो म्हणाला की, "मी प्रभू रामाची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारायला नाही, तर त्यांच्याकडून शिकायला आलो आहे. त्यांच्यातील साधेपणा आणि पवित्रता आपल्या आयुष्यात उतरवणे हा माझ्यासाठी एक अतिशय नम्र अनुभव आहे." दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी स्पष्ट केले की, हा चित्रपट केवळ चांगल्या आणि वाईटातील युद्ध नसून, मानवी भावना, मूल्ये आणि घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांची एक सखोल कहाणी आहे. निर्मात्यांच्या मते, रामाची खरी ताकद त्यांनी काय जिंकले यात नसून त्यांनी कर्तव्यासाठी काय त्याग केला, यामध्ये दडलेली आहे.

या चित्रपटात रणबीर कपूरसोबतच तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी 'माता सीता'च्या भूमिकेत, कन्नड सुपरस्टार यश 'रावण'च्या भूमिकेत, तर सनी देओल 'हनुमान'च्या भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मणच्या भूमिकेसाठी रवी दुबेची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, या चित्रपटाला ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान आणि हंस झिमर यांचे संगीत लाभणार आहे. 'रामायण: भाग 1' दिवाळी 2026 मध्ये प्रदर्शित होणार असून, दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून भारतीय संस्कृती आणि आस्थेचा एक जागतिक आविष्कार ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com