Rakul-Jackky Wedding: रकुल-जॅकीच्या संगीतात शिल्पाची धमाल! व्हिडिओ झाला व्हायरल

Rakul- Jackky Wedding: समिक्षाने तिच्या हातावर मेंहदी काढल्याचा फोटो शेअर केला आहे.
Rakul Preet Singh-Jackky Bhagnani's Wedding
Rakul Preet Singh-Jackky Bhagnani's WeddingDainik Gomantak
Published on
Updated on

Rakul- Jackky Wedding: चित्रपट निर्माता जॅकी भगनानी आणि बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हे जोडपं गोव्यात २१ फेब्रुवारी २०२४ ला म्हणजेच लग्नगाठ बांधणार आहेत. आता पर्यावरणपूरक लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ते खूप चर्चेत आहे. आता त्यांच्या मेंहदी आणि संगीताचे व्हिडिओ समोर आले आहेत. या कार्यक्रमांदरम्यान बॉलीवूडच्या कलाकारांनी चांगलीच धमाला केले असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाची सध्या बरीच चर्चा आहे आणि त्यांच्या कुटुंबियांशिवाय चित्रपट कलाकारही लग्नाला हजेरी लावण्यासाठी पोहोचले आहेत. संगीत सोहळ्याची अनेक सुंदर झलकही समोर आली आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी रकुल आणि जॅकीच्या संगीत सोहळ्यात जोरदार डान्स केला, ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भूमी पेडणेकर तिची बहीण समिक्षासोबत तिच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात पोहोचली आहे. समिक्षाने या लग्नाच्या कार्यक्रमातील काही झलक सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. समिक्षाने तिच्या हातावर मेंहदी काढल्याचा फोटो शेअर केला आहे.

मंगळवारी रात्री रकुल आणि जॅकीचा संगीत सोहळाही पार पडला, ज्यामध्ये बॉलिवूड स्टार्सनी धमाल उडवली. या संगीत सोहळ्यासाठी खास ड्रेस कोड ठेवण्यात आले आहेत. वास्तविक, जॅकी आणि रकुल यांनी त्यांच्या संगीतासाठी चमकदार कपडे निवडले होते आणि प्रत्येकाला ड्रेस कोडचे पालन करण्यास सांगितले होते.

बॉम्बे टाईम्सच्या रिपोर्टनुसार, जॅकीने लग्नात रकुलसाठी काहीतरी खास प्लान केला आहे. असे सांगितले जात आहे की त्याने रकुलसाठी एक गाणे तयार केले आहे ज्यामध्ये तिची संपूर्ण प्रेमकथा असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com