Rakhi Sawant Boyfriend Adil : राखीच्या बॉयफ्रेंडला पाहून यूजर्स म्हणाले, 'राखी ने आदिल को भी अपने जैसा बना डाला'

राखीचा रंग आदिलवर चढू लागल्याचे दिसून येत आहे.
Rakhi Sawant Boyfriend Adil
Rakhi Sawant Boyfriend Adil Dainik Gomantak

राखी सावंतला बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हटले जाते. ती कुठेही गेली तरी जमाव गोळा होतो. काहींना राखीचे हे कृत्य आवडते तर काहींना ही नौटंकी वाटते. आजकाल राखी आदिल नावाच्या व्यक्तीला डेट करत आहे ज्याच्यासोबत ती अनेकदा स्पॉट केली जाते. त्याचवेळी राखीचा रंग आदिलवर चढू लागल्याचे दिसून येत आहे. आणि ही गोष्ट एका खास कारणासाठी बोलली जात आहे.

Rakhi Sawant Boyfriend Adil
Brahmastra Collection : 'ब्रह्मास्त्र'चा बॉक्स ऑफिसवर धमाका! पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई

आदिल खरंच राखीच्या रंगात सजतोय का!

आत्तापर्यंत राखी हेच सांगताना दिसली आहे की आदिल तिच्या आयुष्यात आल्यामुळे ती खूप बदलली आहे आणि राखी पूर्णपणे त्याच्या रंगात रंगलेली दिसत होती पण आता असे वाटत आहे की राखीच्या ऐवजी आदिलच बदलून जाईल. कारण आता आदिल राखीच्या रंगात अधिकच रंगलेला दिसत आहे. अलीकडेच दोघे एका कार्यक्रमात दिसले होते जिथे राखी नेहमीप्रमाणे फुल ऑन मूडमध्ये होती परंतु आदिलने देखील कोणतीही कसर सोडली नाही.

राखी आणि आदिलचे गाणे रिलीज

आदिल बिझनेसमन असला तरी राखीसोबत आल्यानंतर आता तो मनोरंजन विश्वाचा एक भाग बनला आहे. तो राखी सावंतसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसला आहे. ज्याला खूप पसंती दिली जात आहे. 10 सप्टेंबर रोजी रिलीज होणारे हे गाणे आतापर्यंत अनेकवेळा पाहण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com