R Madhavan FTII President: अभिनेता आर. माधवन हा एफटीआयआयचा नवा अध्यक्ष असणार आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. अलीकडेच, आर माधवनच्या 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
आपल्या ट्विटमध्ये अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी लिहिले की, 'एफटीआयआय आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आर माधवन यांचे हार्दिक अभिनंदन... मला खात्री आहे की, तुमचा अफाट अनुभव या संस्थेला समृद्ध करेल, सकारात्मक बदल घडवून आणेल. माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत.'
अलीकडेच, फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सन्मानार्थ फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये उपस्थित असताना आर माधवनही चर्चेत आला होता.
14 जुलै 2023 रोजी बॅस्टिल डे सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून लुव्रे म्युझियममध्ये डिनरचे आयोजन केले होते.
त्यावेळी, त्याने आपल्या इंस्टाग्रामवरुन डिनरचे अनेक फोटो शेअर केले होते. विशेष म्हणजे, त्याने दोन्ही नेत्यांचे कौतुक करणारी एक लांबलचक नोटही लिहिली होती.
अलीकडेच, आर माधवनच्या 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेला एयरोस्पेस इंजीनियर नांबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट बनवणे हे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान असल्याचे त्याने सांगितले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.