दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh) मृत्यूप्रकरणी (Death case) केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अमेरिकेकडे मदत मागितली आहे. सीबीआयने (CBI) औपचारिक माध्यमातून अमेरिकेशी (America) संपर्क साधला आहे. सुशांत सिंगच्या ईमेल आणि सोशल मीडिया अकाऊंट्समधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यासाठी सीबीआयने अमेरिकेची मदत मागितली घेतली आहे. 14 जून (2020) रोजी झालेल्या आत्महत्येच्या घटनेचे कारण काय असावे हे शोधण्याचा प्रयत्न हा डेटा मिळवून केला जाईल, असे तपास यंत्रणेने सांगितले.
एमएलएटी (Mutual Legal Assistance Treaty) अंतर्गत कॅलिफोर्नियास्थित गुगल आणि फेसबुककडून माहिती मागवण्यात आली आहे. सीबीआयने गुगल आणि फेसबुकला सुशांतच्या डिलीट केलेल्या चॅट, ईमेल किंवा पोस्टचे तपशील शेअर करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून त्यांचे विश्लेषण करता येईल आणि निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास काही मदत होईल. भारत आणि यूएस मध्ये MLAT आहे, ज्या अंतर्गत दोन्ही बाजूची तपासयंत्रणा कोणत्याही देशांतर्गत तपासासंबंधी माहिती मिळवू शकतात, जे सहसा शक्य नसते.
कोणतीही कसर सोडणार नाही
गृह मंत्रालय (MHA) ही एमएलएटी अंतर्गत अशी माहिती प्राप्त करण्यासाठी किंवा सामायिक करण्यासाठी भारतातील केंद्रीय प्राधिकरण आहे. अशी माहिती अमेरिकेतील अॅटर्नी जनरलच्या कार्यालयाने दिली आहे. 'या प्रकरणाला अंतिम स्वरूप देण्याआधी आम्ही कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. या संदर्भात उपयुक्त ठरेल अशा काही चॅट किंवा पोस्ट आहेत का हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे.' असे म्हणत भारतीय अधिकाऱ्यांनी अमेरिकेकडे सुशांतच्या डेटा ची मागणी केली आहे.
MLAT कडून माहिती घेण्याची प्रोसेस
सुशांत सिंगच्या मृत्यूच्या तपासाला अंतिम रूप देण्यास आणखी काही वेळ लागू शकतो कारण एमएलएटीद्वारे माहितीची देवाणघेवाण ही एक लांब आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. प्रीमियर एजन्सीने गेल्या वर्षी एका निवेदनाद्वारे सांगितले होते की ते या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत. "अमेरिकेला डेटा शेअर करण्याचे आवाहन करणे हा या प्रकरणाच्या तळाशी जाण्याच्या सर्व प्रयत्नांचा एक भाग आहे," असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.