प्रिया मराठे यांचे निधन! 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्रीने वयाच्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Priya Marathe Death News: 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हीचे रविवार (३१ ऑगस्ट २०२५) रोजी निधन झाले
priya marathe death
priya marathe deathDainik Gomantak
Published on
Updated on

Actress Priya Marathe Passes Away: 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हीचे रविवार (३१ ऑगस्ट २०२५) रोजी निधन झाले. ती गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी झुंज देत होती. अवघ्या ३८ व्या वर्षीच तिने मुंबईत अखेरचा श्वास घेतला. प्रियाच्या निधनाने हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

२३ एप्रिल १९८७ रोजी मुंबईत जन्मलेल्या प्रिया मराठे हिने शिक्षण पूर्ण झाल्यावर अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. 'या सुखांनो या' या मराठी मालिकेतून तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर 'चार दिवस सासूचे' या गाजलेल्या मालिकेतही तिने महत्त्वाची भूमिका साकारली.

priya marathe death
Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

प्रिया मराठेने मराठीच नाही तर हिंदी मालिकांमध्येही आपले स्थान निर्माण केले. बालाजी टेलिफिल्म्सच्या 'कसम से' मालिकेत त्यांनी विद्या बाली ही भूमिका केली. त्यानंतर 'कॉमेडी सर्कस'च्या पहिल्या सिझनमध्येही ती दिसल्या. २०१२ मध्ये सोनी टीव्हीवरील 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेत तिने ज्योती मल्होत्रा ही व्यक्तिरेखा साकारली.

'तू तिथे मी', 'भागे रे मन', 'जयस्तुते' आणि 'भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप' यांसारख्या अनेक मालिकांमध्येही प्रियाच्या भूमिका गाजल्या. 'पवित्र रिश्ता' या मालिकेत 'वर्षा सतीश' या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.मालिकांसोबतच प्रिया मराठेने चित्रपटांमध्येही काम केले. २००८ साली प्रदर्शित झालेल्या 'हमने जीना सीख लिया' या हिंदी चित्रपटात तिची भूमिका होती. याशिवाय, गोविंद निहलानी दिग्दर्शित 'ती आणि इतर' या मराठी चित्रपटातही तिने महत्त्वाचे पात्र साकारले होते.

या चित्रपटात सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष यांच्यासारखे दिग्गज कलाकार त्यांच्यासोबत होते. अल्पावधीतच आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या या गुणी अभिनेत्रीच्या निधनाने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com