पॉप स्टार जस्टिन बीबरला चेहऱ्यावर झाला पॅरालिसिस; पहा व्हिडीओ

जस्टिन बीबरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून त्याला रामसे हंट सिंड्रोम झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Justin Bieber Partial Face Paralysis
Justin Bieber Partial Face ParalysisDainik Gomantak

हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक (Singer) जस्टिन बीबर (Justin Bieber) सुट्टीवरती गेला आहे. सतत कॉन्सर्ट करणारा जस्टिन आता आपल्या शरीराला काही काळ विश्रांती देताना दिसून येत ​​आहे. याचे कारण म्हणजे जस्टिन दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. जस्टिन बीबरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून त्याला रामसे हंट सिंड्रोम (Ramsay Hunt syndrome) झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि त्यामुळे त्याच्या अर्ध्या चेहऱ्यावर अर्धांगवायू झाला आहे. (Justin Bieber Partial Face Paralysis)

Justin Bieber Partial Face Paralysis
अभिनेत्री कंगनाच्या पिकनिकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

जस्टिनला चेहऱ्याचा पैरालिसिस झाला आहे

इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करून जस्टिन बीबरने चाहत्यांना सांगितले की तो त्याचा कॉन्सर्ट शो (Concert show) का रद्द करत आहे. व्हिडिओमध्ये जस्टिन म्हणतो की, 'मला हा आजार एका विषाणूमुळे झाला उद्भवला आहे, जो माझ्या कामावर आणि माझ्या चेहऱ्याच्या मज्जातंतूंवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे माझ्या चेहऱ्याच्या एका बाजूला पूर्णपणे अर्धांगवायू (Paralysis) झाला आहे. तुम्ही बघू शकता की माझा एक डोळा लुकलुकत नाही. मला त्या बाजूने हसूही येत नाही आणि माझे माझे नाक त्या बाजून हलतही नाही.

जस्टिन बीबरचे चाहते त्याचा आगामी शो रद्द केल्यामुळे प्रचंड संतापले होते. त्यांना संदेश देताना जस्टिनने सांगितले की, तो सध्या स्टेजवर फिजिकली परफॉर्म करू शकणार नाही. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्यास सांगितले आहे. व्हिडिओमध्ये त्याने म्हटले की, 'ही गोष्ट खूपच गंभीर आहे, तुम्ही बघू शकता. माझी इच्छा आहे परफॉर्म करण्याची परंतु माझ्या शरीराने साथ दिली नाही डॉक्टरांनी मला सांगितले आहे की मला थोडे थांबावे लागेल. मला आशा आहे की तुम्ही समजून घ्याल आणि मी हा वेळ विश्रांती आणि आरामात घालवणार आहे जेणेकरून मी 100 टक्के बरा होऊ शकेन आणि परत येईन. मी जे करण्यासाठी जन्मलो ते करू शकेन.

Justin Bieber Partial Face Paralysis
Netflix Most Watch Movies: नेटफ्लिक्सवरही बॉलिवूड चित्रपटांचा बोलबाला!

रामसे हंट सिंड्रोम म्हणजे काय?

रामसे हंट सिंड्रोम किंवा RHS हा एक प्रकारचा दुर्मिळ न्यूरोलॉजिकल रोग आहे. या रोगामध्ये कानाभोवती, चेहऱ्यावर किंवा तोंडावर वेदनादायक पुरळ येतात. याशिवाय रुग्णाच्या चेहऱ्यावर अर्धांगवायू देखील उद्भवू शकतो. आणि यामुळे कानात बहिरेपणाची गंभीर समस्याही उद्भवू शकते. जेव्हा व्हेरिसेला-झोस्टर विषाणू डोक्याच्या मज्जातंतूंना संक्रमित करतो तेव्हा हा दुर्मिळ रोग उद्भवतो. या विषाणूमुळे लहान मुलांमध्ये कांजिण्या आणि प्रौढांमध्ये शिंगल्स देखील होतात.

चाहते जस्टिनसाठी प्रार्थना करत आहेत

जस्टिनने त्याच्या चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. त्याचवेळी, आपण बरे होऊन लवकरच परत येऊ, असे आश्वासन देखील त्याने आपल्या चाहत्यांना दिले आहे. जस्टिनने सांगितले की, तो डॉक्टरांनी सांगितल्यानुसार चेहऱ्याचा व्यायाम करत आहे जेणेकरून त्याचा चेहरा पहिल्यासारखा होऊ शकेल. किती वेळ लागेल माहीत नाही पण माझी देवावर श्रद्धा आहे असं ही तो यावेळी म्हणाला. जस्टिन बीबरचे चाहते आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com