‘अ’ मराठी राज्य नाट्यस्पर्धेत आजचे नाटक ‘फक्त 24 तास’ 

सध्या जगभरात गुन्हेगारीचे जे प्रमाण वाढत चाललेले आहे त्याला ‘नीड’ आणि ‘ग्रीड’मधल्या ह्या रेषेचा आपल्याला पडलेला विसर हेच बहुधा मुख्य कारण असावे.
‘अ’ मराठी राज्य नाट्यस्पर्धेत आजचे नाटक ‘फक्त 24 तास’

‘अ’ मराठी राज्य नाट्यस्पर्धेत आजचे नाटक ‘फक्त 24 तास’

Dainik Gomantak 

Published on
Updated on

'नीड’ आणि ‘ग्रीड’ ह्या दोनामध्ये एक छोटीशी रेषा असते. परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केलेली आहे, त्यात इतर प्राण्यांना बहुतेक वेळा ह्या रेषेचा अंदाज असतो पण माणूस हा असा एकमेव प्राणी आहे ज्याला ह्या रेषेचा विसर पडत चाललेला आहे. माणसाला स्वप्ने पडतात, इतर जनावरांनाही पडत असावीत कदाचित, पण दोघांमध्ये फरक एवढाच आहे की, माणूस आपली स्वप्ने खरी करायला घावतो, आणि धावता धावता तो ह्या शर्यतीत इतका गुंग होत जातो की ‘माणुसकी’ हे आपल मूळ तत्त्व आहे किंवा असायला हवे हेच तो विसरून जातो. ह्या जगात आपण काय घेऊन आलोय आणि आपण इथून काय घेऊन जाणार हे दोनच प्रश्न जर आपण स्वतःला विचारले तर कदाचित ही अदृश्‍य शर्यत थांबवून आपल्याला थोडा मोकळा श्वास घेता येईल. सध्या जगभरात गुन्हेगारीचे जे प्रमाण वाढत चाललेले आहे त्याला ‘नीड’ आणि ‘ग्रीड’मधल्या ह्या रेषेचा आपल्याला पडलेला विसर हेच बहुधा मुख्य कारण असावे.

आपल्याला काय हवं? किती हवं? कसं मिळवायचं? हे बहुतेक वेळा आपल्याला कळत नाही हेच दर्शविणार हे नाटक आहे- ‘फक्त 24 तास’डॉक्टर अभिराम जोशी, त्याची पत्नी राधिका आणि त्यांची आठ वर्षांची मुलगी अनुरा मुंबईला (Mumbai) राहतात. घरात आनंदी वातावरण आहे कारण 2 दिवसात अनुराचा वाढदिवस असतो आणि त्याच वेळी डॉ जोशींना, त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या योगदानाबद्दल ‘आयएमए’चा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर होतो. जोशी परिवाराचा आनंदात अधिकच भर पडते. पुरस्कार (Award) घेण्यासाठी अभिरामला दिल्लीला जावं लागतं, पण आपण अनुराच्या वाढदिवसाला नक्की येणार असे वचन तो तिला देतो पण नियतीने त्यांच्या नशिबात वेगळंच काहीतरी लिहिलेलं असतं.

<div class="paragraphs"><p>‘अ’ मराठी राज्य नाट्यस्पर्धेत आजचे नाटक ‘फक्त 24 तास’</p></div>
हरनाज संधूला बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही करायचंय काम

राधिकासमोरच अनुराचे अपहरण होते आणि तिला परत करण्याकरिता अपहरणकर्ते त्यांच्याकडे 3 कोटींची खंडणी मागतात. ते सांगतात तसं करण्यावाचून काही पर्याय नाहीये हे डॉक्टरांच्या लक्षात येते आणि ते आपलं सगळं गहाण ठेवून, आपल स्वप्न म्हणजेच नवीन हॉस्पिटलचे काम बाजूला ठेवून 24 तासांच्या आत पैसे गोळा करतात पण अपहरणकर्ते शेवटच्या क्षणी अनुराला परत न करता पैसे (Money) घेऊन पळून जातात.

डॉक्टर (Doctor) घरी परततो. अनुराला शोधण्यासाठी आपली सगळी शक्ती पणाला लावतो. तिला शोधण्याच्या प्रक्रियेत ‘नीड’ आणि ‘ग्रीड’ ह्या रेषेचं काय महत्त्व आहे हे सगळ्यांना कळायला लागते.

मूळ लेखक : तन्वीर खान

अनुवाद : वर्धन कामत

दिग्दर्शक : सुशांत नायक

संस्था : श्री नागेशी महालक्ष्मी प्रासादिक नाट्य समाज, बांदोडा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com