दाक्षिणात्य अभिनेत्री 'Pauline Jessica'ची 29 व्या वर्षी चटका लावणारी एक्झिट

Tamil actress Pauline Jessica found hanging: तमिळ चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
Pauline Jessica
Pauline JessicaDainik Gomantak
Published on
Updated on

तमिळ चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या इंडस्ट्रीतील उगवती अभिनेत्री पॉलीन जेसिका उर्फ ​​दीपा हिचे निधन झाले आहे. ​​पॉलीन जेसिका तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्रीच्याच अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय अभिनेत्रीने तिच्या लव्ह लाईफच्या समस्यांमुळे आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

पॉलीन जेसिकाचा (Pauline Jessica) मृतदेह तिच्या घराच्या एका खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. चेन्नईच्या विरुगम्बक्कम मल्लिकाई एव्हेन्यूमध्ये ती एकटीच राहत होती. पोलीसांचा तपास सुरू आहे. रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की दीपाचे पालक तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करण्यास भाग पाडत होते. दीपा मायस्किन दिग्दर्शित 'थुप्परीवलन' या हिट चित्रपटातही दिसली होती.

Pauline Jessica
फसवणूक प्रकरणी Sapna Chaudhary ला लखनौ कोर्टाने घेतले ताब्यात, वाचा संपूर्ण प्रकरण

तामिळ अभिनेत्री पॉलीन जेसिकाला लोक प्रेमाने दीपा म्हणत होते. या नावानेच तिला ओळख मिळाली आहे. रिपोर्टनुसार तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. या बातमीनंतर संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. पॉलीन जेसिकाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती वैधा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटासोबतच (Movie) ती थुप्परीवलनमध्येही दिसली होती. यासोबतच ती सहाय्यक भूमिकेतही दिसली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com