Pathaan Viral Video: पॅरिसमध्येही ‘पठाण’चा डंका; फॅन्सचा थिएटरमध्येच जल्लोष! पाहा व्हिडिओ

देशातच नव्हे तर जगभरात ‘पठाण’ चित्रपट चांगलीच धुमाकुळ घालत आहे.
Pathaan
Pathaan Dainik Gomantak

Pathaan Viral Video: शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने केवळ बॉलिवूडच नाही तर, जगभरात धुमाकूळ घातला आहे. ‘पठाण’ या चित्रपटातून शाहरुखने तब्बल ४ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर परतला आहे.

इतक्या वर्षानंतरही किंग खानची जादू थोडीसुध्दा कमी झालेली नाही. याची प्रचीती या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादातून येत आहे. थिएटरमध्ये ‘पठाण’ पाहून चाहते आणि प्रेक्षक चांगलाच जल्लोष करत आहेत.

देशातच नव्हे, तर जगभरात प्रेक्षकांच्या विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. नुकताच पॅरिसच्या थिएटरमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पॅरिसमधील एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रेक्षक 'झूम जो पठाण' गाण्यावर नाचताना दिसत आहेत. असे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ‘पठाण’ चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्सुकता पाहायला मिळत आहे. काही व्हिडीओंमध्ये प्रेक्षक ‘पठाण’च्या गाण्यांवर नाचतानाही दिसत आहेत.

‘पठाण’ या चित्रपटाने (Movie) बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शाहरुखचा हा चित्रपट दर दिवशी तब्बल 100 कोटींची कमाई करत आहे. ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाची रंगत अधिक वाढवली आहे.

एकीकडे ‘पठाण’ धुमाकूळ घालत असताना आता प्रेक्षकांना आणखी एक सरप्राईज मिळणार आहे. ‘पठाण’च्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांच्या या निर्णयामुळे चाहते आणि प्रेक्षक खूश झाले आहेत. एका अहवालानूसार निर्मात्यांनी चित्रपटाच्या तिकिटाची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, ‘पठाण’ चित्रपटाच्या तिकिटांच्या किंमतीत तब्बल 25 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com