Parineeti Chopra: कंगना रनौत अन् परिणिती चोप्रा राजकारणाच्या मैदानात?

Parineeti Chopra: लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
Parineeti
Parineeti Dainik Gomantak
Published on
Updated on

Parineeti Chopra: किरण खेर या दोनदा चंदीगडमधून खासदार झाल्या आहेत, पण यावेळी त्या निवडणुकीत भाग घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. हिमाचलची रहिवासी आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत चंदिगड लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आता कंगना राणौतने यावर मौन सोडले आहे. त्याचवेळी आम आदमी पार्टी बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रालाही मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

गेली 10 वर्षे खासदार म्हणून काम करणाऱ्या किरण खेर या आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. चंदीगडच्या खासदार किरण खेर या सर्वसामान्यांच्या समस्या ऐकण्यासाठी कधीच मैदानात दिसत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

आता अशा स्थितीत किरण खेर यांच्या जागी नवीन चेहरा उतरवण्याचा विचार भाजप करत आहे. दरम्यान, कंगना राणौत काही काळापासून भाजपच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करत आहे. यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप कंगना रणौतला चंदीगडमधून उमेदवारी देऊ शकते, असे म्हटले जात आहे.

मात्र या बातम्यांदरम्यान अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया देत हे वृत्त फेटाळून लावले आहे. कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले आहे की, 'मी हेडलाइन दिली आहे असे समजून माझे नातेवाईक आणि मित्र मला ते पाठवत आहेत, पण ही हेडलाइन आणि बातमी माझ्याकडून देण्यात आलेली नाही.'

दरम्यान, राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, आम आदमी पार्टी पुढच्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिला आपला नवा उमेदवार बनवू शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com