Pankaj Tripathi: 'मैं अटल हूँ' आता ओटीटीवर! जाणून घ्या कुठे अन् कधी होणार रिलिज

Pankaj Tripathi: आता हा चित्रपट ओटीटीवर रिलिज होण्यासाठी सज्ज झाला आहे.
Pankaj Tripathi
Pankaj TripathiDainik Gomantak

Pankaj Tripathi starrer mai atal hu movie release ott

पंकज त्रिपाठी हे आपल्या सहज अभिनयासाठी ओळखले जातात. नुकताच त्यांचा 'मैं अटल हूँ' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाने म्हणावी अशी कमाई केली नसली तरी पंकज त्रिपाठींनी आपल्या अभिनयामुळे तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांची उत्तम भूमिका साकारताना दिसले आहेत. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलिज होण्यासाठी सज्ज झाला आहे.

OTT प्लॅटफॉर्म ZEE5 ने सोशल मीडियावर पोस्ट केले की 'मैं अटल हूँ' हा चित्रपट 14 मार्च 2024 रोजी प्रीमियर होणार आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये चित्रपटाच्या कलाकारांना टॅग केले असून तयारी सुरू करा, अटल बिहारी येत आहेत असे कॅप्शन दिले आहे, '

मैं अटल हूं' हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आणि राजकीय प्रवासावर आधारित चित्रपट आहे, जे केवळ पंतप्रधान म्हणून नव्हे तर कवी आणि राजकारणी म्हणूनही प्रसिद्ध होते. पंकज त्रिपाठी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात पियुष मिश्रा, दया शंकर पांडे, राजा सेवक, एकता कौल आणि अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती विनोद भानुशाली, संदीप सिंग आणि कमलेश भानुशाली यांनी भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओच्या बॅनरखाली केली आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये पंकज त्रिपाठीच्या कामाची खूप प्रशंसा झाली होती. आता, OTT वर हा चित्रपट रिलीझ झाल्यानंतर प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हे 14 मार्चला Zee5 वर हा चित्रपट रिलिज होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com