Oscars 2022: ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रपट पहिले नसतील तर ही बातमी तुमच्यासाठीच

जर तुम्ही ऑस्कर विजेते चित्रपट पहिले नसतील तर तुम्ही घर बसल्या हे चित्रपट पाहु शकता.
Oscars 2022 winner movies List
Oscars 2022 winner movies ListDainik Gomantak
Published on
Updated on

ऑस्कर पुरस्कार 2022 विजेत्यांची (Oscars 2022) घोषाण 28 मार्च रोजी करण्यात आली आहे. अनेक कलाकारांना हा पुरस्कार (Award) देवून गौरवण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, कॉस्ट्यूम डिझायनर आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट या कॅटेगिरीमधील पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. यामध्ये ड्यून, कोडा, किंग रिचर्ड क्रुएला, ड्राइव माय कार आणि अॅनकँटो या चित्रपटांना अनेक कॅटेगिरीमधील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. जर तुम्ही हे चित्रपट पाहिले नसतील तर तुम्ही घरबसल्या ओटीटी (OTT) प्लॅटफोर्मवर पाहू शकता. (Oscars 2022 winner movies List)

* ड्यून
या चित्रपटाने (Movie) 11 श्रेणीमध्ये 6 ऑस्कर जिकले आहेत. हा चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहण्याचा आनंद घेऊ शकता. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओ, यूट्यूब मूव्हिज या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

* कोडा
हा चित्रपट ऑस्करमध्ये बेस्ट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळाले आहे. CODA हा ‘Child of Deaf Adults’ चा शॉर्ट फॉर्म आहे. हा चित्रपट तुम्ही Apple TV+या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

* किंग रिचार्ड
हा चित्रपट रिचर्ड विलियम्स (Richard Williams) च्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटासाठी विल स्मिथ यांना बेस्ट अॅक्टर म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे. हा चित्रपट 25 मार्च रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे.

Oscars 2022 winner movies List
रिलीज होण्याआधीच 'KGF Chapter 2' ने केला विक्रम

* एन्कांटो

हा एक एनिमिटेड चित्रपट आहे. या चित्रपटाला बेस्ट एनिमिटेड चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे.हा चित्रपट तुम्ही Disney+Hotstar वर पाहू शकता.

* द आय ऑफ टॅमि फाय

या चित्रपटासाठी अभिनेत्री जेसिका चॅस्टेनला सर्वेत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा चित्रपट तुम्ही Disney+Hotstar या ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता.

* वेस्ट साइड स्टोरी
या चित्रपटासाठी अरियाना डीबोसला सर्वेत्कृष्ट अभिनेत्री सहाय्यक भूमिका पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. हा चित्रपट तुम्ही Disney+Hotstar या ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com