'KGF 2' स्टारर यशला पान मसाल्याच्या जाहिरातीची ऑफर

बॉक्स ऑफिसवर 'KGF 2' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत असलेल्या यशने पान मसाला आणि वेलचीच्या ब्रँडच्या जाहिरातीची ऑफर नाकारली आहे.
KGF 2
KGF 2Dainik Gomantak

पान मसाला ब्रँडच्या जाहिरातीत बॉलिवूडचे (Bollywood) तीन मोठे स्टार्स सहभागी झाले होते, तेव्हा सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ झाला होता. अनेक यूजर्सने बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमारला (Akshay Kumar) सोशल मिडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. त्यामुळे अक्षयला माफी मागावी लागली. आता एका आठवड्यानंतर, पान मसाला ब्रँडने एका जाहिरातीसाठी दाक्षिणात्य अभिनेता यशशी (Yesh) संपर्क साधला आहे. पण लोकांच्या भावना आणि आरोग्य लक्षात घेऊन यशने या जाहिरातीची ऑफर नाकारली आहे. बॉक्स ऑफिसवर (Box Office) KGF-2 या चित्रपटाने प्रचंड कमाई केली आहे.

याबद्दल माहिती देताना यशच्या जाहिरातीचे व्यवस्थापन करणाऱ्या एजन्सीने सांगितले की, "पान मसाला आणि अशा उत्पादनांचा लोकांच्या आरोग्यावर (Health) परिणाम होऊ शकतो आणि त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. यशने त्याच्या चाहत्यांचे आणि फॉलोअर्सचे कौतुक केले आहे. हे लक्षात घेऊन लोकांच्या हितासाठी, वैयक्तिकरित्या खूप फायदेशीर असलेला करार नाकारला आहे. "एजन्सीने पुढे माहिती दिली कि, "यशचे संपूर्ण भारतातील आवाहन पाहता, आम्ही या संधीचा उपयोग त्याच्या चाहत्यांना आणि अनुयायांना योग्य प्रकारचा संदेश देण्यासाठी आणि विवेकबुद्धी असलेल्या ब्रँडसाठी आणि तो असावा यासाठी आमचा वेळ घालवू इच्छितो."

KGF 2
सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन

* अक्षय कुमार ट्रोलर्सच्या निशाण्यावर

अक्षय कुमारने पान मसाला या ब्रँडपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही बातमी समोर आली आहे. अक्षय कुमारने अलीकडेच अजय देवगण (Ajay Devgn) आणि शाहरुख खानसोबत विमलच्या वेलची उत्पादनांची जाहिरात केली. यानंतर त्याला सोशल मीडियावर (Social Media) चाहत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. सततच्या ट्रोलिंगमुळे, अक्षय कुमारने ब्रँडची जाहिरात न करण्याचा निर्णय घेतला आणि भविष्यात हुशारीने जाहिरात निवडण्याचे वचन दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com