Nita Ambani Dance Video: नीता अंबानींनी भक्तीगीत 'विश्वंभरी स्तुती' सादर केले सुंदर नृत्य

Radhika Merchants pre-wedding celebrations: एएनआयने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये नीता अंबानी यांनी पारंपारिक केशरी साडी नेसून नर्तकांसोबत परफॉर्म करताना दिसत आहे.
 Radhika Merchants pre-wedding celebrations:
Radhika Merchants pre-wedding celebrations:Dainik Gomantak
Published on
Updated on

Nita Ambani performed Anant Ambani Radhika Merchants pre-wedding celebrations in Jamnagar watch video

नीता अंबानी यांनी त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात 'विश्वंभरी स्तुती' या भक्तीगीतावर सुमदर नृत्य सादर केले. तीन दिवस चाललेल्या या महाआरतीसह रविवारी रात्री काही कार्यक्रमांची सांगता झाली. रविवारी उत्सवाचा एक भाग म्हणून, नीता अंबानी यांनी हे गाणं माता अंबेला समर्पित केले आहे. एएनआयने हा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे.

एएनआयने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये नीता अंबानी यांनी पारंपारिक केशरी साडी नेसून नर्तकांसोबत परफॉर्म करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. प्रत्येक नवरात्रीत नीता अंबानी लहानपणापासून हे भजन ऐकत असल्याचे समोर आले आहे. अनंत आणि त्याची लवकरच होणारी पत्नी राधिका मर्चंट यांच्या एकत्र येण्याच्या प्रवासासाठी माता अंबेचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी हे गाणे सादर केले.

दरम्यान, अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग सोगळ्याची चर्चा देशभरात सुरू आहे. जगभरातून वेगवेगळ्या क्षेत्रांमधून पाहुणे आले आहेत.गुजरामधील जामनगर येथे साहळा पार पडत आहे.

अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडताना दिसतो आहे. या सोहळ्याला बॉलीवूड स्टार्ससह बिझनेस, राजकारण, समाजकारण, साहित्य आणि कला क्षेत्रातील मान्यवर यांनी सोहळ्याला हजेरी लावली आहे.

मुकेश आणि नीता अंबानी यांचा राज कपूर यांच्या चित्रपटातील एका गाण्यावर केलेला डान्स देखील चांगलाच व्हायर झाला. तसेच नेटकर्यांनी या व्हिडिओवर आनंदाचा वर्षाव केला होता.

गुजरामधील जामनगरमध्ये पार पडणाऱ्या या सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिजियावर व्हायरल होत आहेत. तसेच प्रत्येक कार्यक्रमाची चर्चा देखील होत आहे. या सोहळ्यात ड्रेस कोड देखील ठेवण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com