Neetu Kapoor: नीतू कपूर अन् आलियामधील वादाच्या चर्चांना पुन्हा उधाण

Neetu Kapoor: आता आलिया भट्टने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक कोट शेअर केला आहे.
Alia Bhatt-Neetu Kapoor
Alia Bhatt-Neetu KapoorDainik Gomantak
Published on
Updated on

Neetu Kapoor: गेल्या काही दिवसांपासून आलिया भट्ट आणि नीतू कपूर भलत्याच चर्चेत आहेत. या दोघी सासू-सूनांमध्ये कोल्डवॉर सुरु असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे.

अॅनिमलच्या सक्सेस पार्टीतदेखील दोघींनी एकमेकींना नजरअंदाज केल्याचे पाहायला मिळाले होते. रणबीर कपूरवरुन त्यांच्यात हे शीतयुद्ध सुरु असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. आता पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आले आहे. याला कारण ठरले ते म्हणजे आलिया आणि नीतू कपूर यांच्या सोशल मिडियावरील पोस्ट आहे.

अलीकडेच नीतू कपूरने मुलगा रणबीर कपूरसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या पायाची मालिश करताना दिसत आहे. तो क्षण खूप मौल्यवान होता आणि तो शेअर करताना नीतूने लिहिले, 'तू चंद्र आहेस, तू माझा सूर्य आहेस...पण तू इतका सरळही नाहीस.' आलियाची आई सोनी राजदान हिलाही नीतूची पोस्ट लाईक झाली. मात्र, सुनेने म्हणजेच आलियाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता आलिया भट्टने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक कोट शेअर केला आहे.

Alia Social Media
Alia Social MediaDainik Gomantak

त्यात लिहिले आहे- जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सूर्यासारखे जळायला शिका. यामुळे अनेकांना ती सासू नीतू कपूरच्या कॅप्शनला रिप्लाय देत असल्याचेही म्हटले आहे. यावर अनेकांनी लिहिले की, पती आणि मुलाबाबत दोघींमध्ये वाद सुरू आहे.

अनेकांनी असेही सांगितले की आलिया तिच्या इन्स्टा हँडलवर अशा पोस्ट करत असते. अनेक नेटिझन्सनी अशी पोस्ट शेअर केल्याबद्दल आलियाची खिल्ली उडवली आहे. नेटकऱ्यांनी म्हटले आहे की, आलिया करिअरमध्ये कोणत्याही प्रकारच्या संघर्षातून न जाताही कोणी असे कसे लिहू शकते.

दरम्यान, नीतू कपूर आणि आलिया यांच्या भांडणाबद्दल नेटकरी उलटसूलट चर्चा करत असले तरीही या दोघींनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com