Nayantara: शिवसेनेचे माजी नेते रमेश सोळंकी यांनी नयनतारा यांच्या अन्नपूराणी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या सिनेमात हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप आहे. निर्मात्यांनी भगवान रामाचा अपमान केला आहे. एवढेच नाही तर रमेश सोळंकी यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाला 'हिंदूविरोधी' म्हटले आहे.
रमेश सोळंकी यांनी X हँडलवर दावा केला आहे की, नयनताराचा 'अन्नपूराणी' हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहे. त्यांनी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याविरोधात कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध आणि नेटफ्लिक्स स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर एफआयआर नोंदवावी असे रमेश सोळंकी यांनी म्हटले आहे.
रमेश सोळंकी यांनी त्यांच्या तक्रारीची एक प्रतही शेअर केली आहे आणि त्यात नेटफ्लिक्स आणि झी स्टुडिओला टॅग केले आहे आणि ते म्हणाले की त्यांनी मुद्दाम हा चित्रपट प्राण प्रतिष्ठाभोवती हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी बनवला आहे. यासोबतच त्यांनी सरकार आणि पोलिसांना टॅग करत हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी प्रत्येकावर एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.