Nawazuddin Siddiqui:'...तर मी रस्त्यावर किंवा ट्रेनमध्ये जाऊन अभिनय करेन' नवाजुद्दीन सिद्दीकीचे मोठे वक्तव्य

Nawazuddin Siddiqui: आता बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने एका मुलाखतीदरम्यान असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे प्रेक्षक मोठे आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहे.
Nawazuddin Siddiqui
Nawazuddin SiddiquiDainik Gomantak
Published on
Updated on

Nawazuddin Siddiqui: बॉलीवूडचे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चांचा भाग बनतात. तर कधी हे कलाकार आपल्या वक्तव्यांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. आता बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने एका मुलाखतीदरम्यान असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे प्रेक्षक मोठे आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहे.

एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीनने करिअर चित्रपटाच्या ऑफर्स आणि त्याच्या असुरक्षिततेची भावना याबद्दल बोलताना म्हटले होते की, जर मला चित्रपट मिळणे बंद झाले तर तो कोणाकडेही काम मागण्यासाठी जाणार नाही. तो सर्व काही विकेल आणि एकतर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करेन किंवा रस्त्यावर, ट्रेनमध्ये अभिनय करेल. 2023 अभिनेता चार चित्रपटांमध्ये दिसला, परंतु त्यापैकी एकाही चित्रपटाने बॉक्स ऑफीसनर म्हणावी अशी कामगिरी केली नाही या वर्षीही त्याच्याकडे जवळपास 4-5 चित्रपट आहेत.

मला अनुराग कश्यपकडून खूप प्रेम मिळाले. उद्या माझ्याकडे काम नसेल तर कोणाकडे जाऊन काम मागण्याची माझी हिम्मत होणार नाही. मी काम मागायला जाणार नाही. मी माझे घर आणि सर्व काही विकून चित्रपट बनवणार आहे. मी शूज विकून चित्रपट बनवणार आहे. माझा स्वत:वर इतका विश्वास आहे की मी सर्वस्वाचा त्याग करून चित्रपट करेन. पण मी काम मागायला जाणार नाही.

करिअरबद्दल बोलायचे झाले तर, नवाजुद्दीन सिद्दीकीने 1999 मध्ये आमिर खान स्टारर 'सरफरोश' या चित्रपटात छोट्या भूमिकेतून करिअरला सुरुवात केली. त्यात तो एका रिपोर्टरच्या भूमिकेत होता. पुढे त्यांनी आणखी काही छोट्या भूमिका केल्या. पण आधी 'कहानी' आणि नंतर अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर'ने नवाजुद्दीन सिद्दीकीला यशस्वी अभिनेता बनवले. आता तो लवकरच 'बोले चुडियाँ', 'नूरानी चेहरा', 'संगीन', 'अडभूत' आणि 'सैंधाव' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com