आजपासून नवरात्रोत्सवास जल्लोषात तयारी सुरू झाली आहे. देशभरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा जल्लोषात नऊ दिवस देवीची आराधना केली जाणार आहे. नवरात्री म्हटलं की, केवळ भक्तच नाही तर, त्यांच्याबरोबर बॉलिवूड इंडस्ट्रीही भक्तीमध्ये तल्लीन झालेली दिसते. या खास उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, आजपासून मातेच्या नऊ रूपांची भक्तिभावे पूजा केली जाते. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यात नवरात्रोत्सवाचा जल्लोष दाखवण्यात आला आहे.
* गोलियों की रासलीला राम-लीला
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटातही नवरात्रीचा उत्सव साजरा करताना दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात गरब्यासाठीचे एक धमाकेदार गाणे देखील आहे. या चित्रपटातील (Movie) गाण्याशिवाय गरबा पूर्णच होत नाही.
* हम दिल दे चुके सनम
'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटामधील गाणी गरबासाठी प्रसिध्द झाली आहे. यामध्ये सलमान खान आणि एश्वर्या राय यांनी जबरदस्त काम केले आहे.
* कहानी
या चित्रपटात विद्या बालनने कोलकाता येथे दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान कोलकाता येथे तिच्या हरवलेल्या पतीचा शोध घेत असलेल्या गर्भवती महिलेची भूमिका साकारली आहे. माँ दुर्गेच्या या उत्सवाचा जल्लोष देखील या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात कोलकात्याच्या संस्कृतीचे अर्थात दुर्गापूजेचे चित्रण करण्यात आले आहे.
* लवयात्री
‘लवयात्री’ या चित्रपटामध्ये आयुष शर्मा आणि वारिना हुसैन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या या उत्सवात दोन प्रेमी एकमेकांना कसे भेटतात आणि प्रेमात पडतात, या कथेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात नवरात्रीनंतरचा त्यांचा प्रेमप्रवासही दाखवण्यात आला आहे. चित्रपटातील 'चोगडा' हे गाणे नवरात्रीच्या उत्सवावर आधारित असून, दरवर्षी नवरात्रीत आणि गरब्यात या गाण्याचा आनंद घेतला जातो.
* काय पो चे
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत, राज कुमार राव आणि अमित साध स्टारर 'काई पो चे' या चित्रपटातही नवरात्रोत्सवाची जादू पाहायला मिळते. नवरात्रीच्या माहोलात या चित्रपटातील 'शुभारंभ' या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेली नवरात्री स्पेशल गाणी जबरदस्त हिट ठरली आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.