Kapil Sharma Show
Kapil Sharma Show Dainik Gomantak

Zwigato: ऑस्करमध्ये संधी मिळाली अन् नंदिता दासने ओटीटी प्लॅटफॉर्मला झापले

Zwigato: ऑस्करने त्यांच्या कायमस्वरूपी कोर-कलेक्शनमध्ये Zwigatoच्या स्क्रिप्टला स्थान दिले आहे.
Published on

Zwigato: अभिनेता कपील शर्मा नेहमीच आपल्या द कपील शर्मा शो या टीव्हीवरील शोमुळे नेहमीच चर्चेत असतो. आपल्या विनोदांसाठी प्रसिद्ध असलेला हा अभिनेता सध्या चित्रपटांमधून देखील झळकत आहे.

अलिकडेच कपील शर्मा नंदीता दास दिग्दर्शित Zwigato या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून आला होता. बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट आपली जादू दाखवू शकला नसला तरीही समिक्षकांकडून या चित्रपटाचे कौतुक झाले आहे.

आता या चित्रपटाची स्क्रिप्ट अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या लायब्ररीचा एक भाग बनली आहे. यानंतर एकीकडे Zwigato च्या टीमवर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच नंदिता दास यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर टीका केली आहे.

सोशल मिडियावर पोस्ट करत नंदीता दास यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणतात- जेव्हा मला अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस अर्थात ऑस्करकडून एक ईमेल आला तेव्हा मला आश्चर्य वाटले आणि अर्थातच आनंद झाला.

ऑस्करने त्यांच्या कायमस्वरूपी कोर-कलेक्शनमध्ये Zwigatoच्या स्क्रिप्टला स्थान दिलं आहे. ही खूप आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट महत्वाचा आहे आणि तो आम्ही बनवला याचा आनंद आहे.

माझा विश्वास आहे की जेव्हा कथा वास्तविक असतात आणि संदर्भाशी जोडल्या जातात तेव्हा त्या संस्कृती आणि सीमा तोडतात आणि जागतिक सिनेमाचा एक भाग बनतात. याबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर निशाना साधताना नंदीता दास पुढे म्हणतात- 'मला आशा आहे की OTT प्लॅटफॉर्म देखील हे वाचत असतील! मला वाटतं आता प्रेक्षकांना Zwigato पाहण्याची संधी दिली पाहिजे. या सन्मानासाठी अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या लायब्ररीचे आभार!'

दरम्यान, नंदिता दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाची पटकथा समीर पाटील यांनी लिहिली असून कपील शर्माने या चित्रपटात मुख्य भूमिका निभावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com