Ghar Banduk Biryani Trailer: आर्ची नंतर परश्या बनला सायलीचा रोमँटिक हिरो, 'घर बंदूक बिरयानी’चा ट्रेलर आउट

'घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असुन नागराज मंजुळे अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत.
Ghar Banduk Biryani Trailer
Ghar Banduk Biryani TrailerDainik Gomantak

Ghar Banduk Biryani Trailer: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते नागराज मंजुळे सर्वांच्याच ओळखीचे आहे. त्यांचा घर बंदुक बिरयानी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात थोडी हटके कथा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिक वाढली आहे.

'घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.या ट्रेलरमध्ये नागराज मंजुळे अॅक्शन मोडमध्ये दिसले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यात चकमक होताना दिसत आहे.

सैराटमधील परश्याची देखील या ट्रेलरमध्ये झलक पाहायला मिळाली आहे. पण पोलिस आणि डाकुंमध्ये नक्की कशावरून ही चकमक सुरु आहे आणि घर, बंदूक आणि बिरयानीचा (Ghar Banduk Biryani Trailer) याच्याशी नेमका काय संबंध, याचे उत्तर प्रेक्षकांना 7 एप्रिल रोजी मिळणार आहे.

या चित्रपटात पहिल्यादांच नागराज मंजुळे आपल्याला ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळणार आहे. ते एका वेगळ्याच शैलीत दिसत आहेत. तर सयाजी शिंदेही अतिशय रावडी आणि तडफदार अंदाजात दिसत आहे.

सैराट चित्रपटामधील परशा उर्फ आकाशची रोमँटिक अंदाज तरुणांना भावणारी आहे. पार्श्वसंगीत आणि अभूतपूर्व ॲक्शन या दोन गोष्टींनी लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरवरून हा एक ॲक्शन चित्रपट असल्याचे समजत असले तरी यात कौटुंबिक कथाही दडली आहे.

नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील गाणी. ही गाणी भन्नाट लोकप्रिय होतात. या चित्रपटातील तीन गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली असून या गाण्यांनीही अल्पावधीतच धुमाकूळ घातला आहे.

लाखोंच्या वर व्ह्यूज मिळालेल्या या गाण्यांना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यास यश मिळाले आहे. वैभव देशमुख यांचे बोल लाभलेल्या या गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.

नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके चित्रपट दिले आहेत. एका सर्वसाधारण विषयाला अनन्यसाधारण बनवणे, ही यांची खासियत आहे. हीच खासियत जपत आता लवकरच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' रिलीज होणार आहे.

यापूर्वीच या चित्रपटातील (Movie) गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे. टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आहे. या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला असुन नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील याच्या मुख्य भुमिका आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com