Munawar Faruqui: बिग बॉसच्या घरात नेहमीच ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत असतात. आता मात्र फिनाले जवळ येत असातना स्पर्धकांना बिग बॉसकडून आश्चर्याचे धक्के मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक स्पर्धकांचे इव्हिक्शन या आठवड्यात होणार आहे. चिंटू उर्फ समर्थ जुरेलचा प्रवास आता संपला आहे.
यादरम्यानच मुनव्वर फारुकीबदद्दल मोठी चर्चा होताना दिसत आहे. नॉमिनेशन टास्कनंतर आएशा खानने मुन्नवरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठे भाष्य केले होते. त्यानंतर तो रडताना दिसला, वारंवार माफी मागताना दिसला होता. आता या सगळ्यावर त्याच्या घरच्यांनी हा एपिसोड पाहिल्यानंतर अत्यंत वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता मुलाखतीत मुनव्वरचा मेहुणा अल्ताफ म्हणाला, 'आम्हाला स्वतःला धक्का बसला. त्याला तसे बघणे सहन होत नव्हते. आम्ही पूर्ण एपिसोडही पाहिला नाही. परवा पाहिला. आवडले नाही. आमचं मूल खूप निरागस आहे. ते त्याला खूप टार्गेट करत आहेत. तो सॉरी म्हणत आहे. आपण यावर नंतर चर्चा करु असेही तो म्हणत आहे. अशा प्रकारे तुम्ही घरात कोर्टासारखी त्याची चौकशी करत आहात. हा तुमचा अधिकार नाही. आम्हाला खूप त्रास झाला.
त्याचवेळी बहिण म्हणाली, 'झाल ते खूप झाले. त्याला त्या अवस्थेत बघणे आम्हाला आवडले नाही. त्याचे रडणे आणि माफी मागणे,आम्हाला ते अजिबात आवडले नाही. कारण तो तसा नाही. तो अत्यंत शुद्ध अंतःकरणाचा आहे. काल त्याला बघून सगळं घरच दु:खात बुडाले आहे. आपण सर्व बहिणी, आपले सर्व भाऊ. आई, सगळ्यांना त्याची काळजी वाटते. फक्त अल्लाह त्याला हिम्मत देवो. कारण तो खूप तुटलेला आहे. तो जसा आहे तसाच दिसतो. लोक काय बोलतात ते अजिबात नाही.
आता बिग बॉसच्या घरात आणखी काय बघायला मिळणार हे पाहणे प्रेक्षकांसाठी आणि मुन्नवरच्या चाहत्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.