Tom Cruise: तीन लग्न करुन वयाच्या साठीत 'हा' प्रसिद्ध अभिनेता पुन्हा प्रेमात

Tom Cruise: नुकतेच लंडनच्या एअर ॲम्ब्युलन्स चॅरिटीच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या डिनर पार्टीला दोघेही उपस्थित होते
Tom Cruise
Tom CruiseSocial Media

Tom Cruise: बॉलीवूडचे कलाकार असू दे किंवा हॉलीवूडचे असू दे कलाकार हे नेहमीच चर्चेत असतात. चित्रपट, मुलाखती, वादग्रस्त वक्तव्ये किंवा वैयक्तिक आयुष्य असू दे हे कलाकार नेहमीच चर्चेत असतात. आता हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टॉम क्रूझला हा त्याच्या वैयक्तिक आय़ुष्यामुळे चर्चेत असतात.

'मिशन इम्पॉसिबल' फेम ६१ वर्षीय टॉम क्रूझ पुन्हा प्रेमात पडल्याचे म्हटले जात आहे. 36 वर्षीय रशियन सोशलाइट एल्सिना खैरोवाने 61 वर्षीय टॉम क्रूझच्या आयुष्यात प्रवेश केला आहे. टॉमनेही आपले नाते अधिकृत केले असल्याचे म्हटले जात आहे. नुकतेच लंडनच्या एअर ॲम्ब्युलन्स चॅरिटीच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या डिनर पार्टीला दोघेही उपस्थित होते. प्रिन्स विल्यम्सही येथे पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दरम्यान, टॉम तीन मुलांचा बाप आहे आणि आत्तापर्यंत त्याने तीन वेळा लग्न केले आहे आणि त्यांच्यापासून वेगळे झाले आहे. टॉमने 1987 मध्ये मिमी रॉजर्सशी पहिले लग्न केले आणि 1990 मध्ये हे जोडपे वेगळे झाले. यानंतर 1990 मध्ये निकोल किडमनने टॉमच्या आयुष्यात प्रवेश केला आणि 2001 मध्ये दोघे वेगळे झाले. हे नाते तुटल्यानंतर टॉमने 2006 मध्ये 5 वर्षांनी केटी होम्सशी लग्न केले, पण हे नातेही आयुष्यभर टिकले नाही. 2012 मध्ये दोघे वेगळे झाले. आता तो पुन्हा एकदा प्रेमात पडल्याने चर्चेत आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com