मीरा राजपूतचा 4 वर्ष जुना ख्रिसमस ट्री झाला गायब

दरवर्षी ते ख्रिसमस लेबल असलेल्या बॉक्समधून बाहेर येते आणि 26 डिसेंबर रोजी परत जाते.
Mira Rajputs 4 year old Christmas tree has disappeared

Mira Rajputs 4 year old Christmas tree has disappeared

Dainik Gomantak

Published on
Updated on

ख्रिसमसच्या पार्ट्या सुरू झाल्या आहेत. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक सेलिब्रिटींनी आपल्या घरी ख्रिसमस ट्री (Christmas Tree) सजवला आहे. त्याचबरोबर काहीजण यानिमित्त पार्टीचेही आयोजन करणार आहेत. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत (Mira Rajput) दरवर्षी त्यांच्या मुलांसोबत हा सण साजरा करतात. मात्र यावर्षी मीरा नाराज झाली आहे. मीराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती ख्रिसमस ट्रीला सजवताना दिसत आहे. आणि तिने सांगितले की ही तीची वेळेवरची तयारी आहे कारण तिने चार वर्षांपासून सजवलेला तीचा ख्रिसमस ट्री गमावला आहे.

<div class="paragraphs"><p>Mira Rajputs 4 year old Christmas tree has disappeared</p></div>
प्रियांका चोप्राने मॅट्रिक्स 4 ची लपवून ठेवली होती स्क्रिप्ट

मीराने तिच्या व्हिडिओसह एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'हो... आम्ही ख्रिसमस (Christmas) ट्री गमावला. मी गेल्या 4 वर्षांपासून तेच सुंदर 6 फूट उंच, गडद हिरवे झाड सजवत आहे आणि दरवर्षी काही नवीन सजावट या झाडाला करत असे. दरवर्षी ते ख्रिसमस लेबल असलेल्या बॉक्समधून बाहेर येते आणि 26 डिसेंबर रोजी परत जाते.

<div class="paragraphs"><p>Mira Rajputs 4 year old Christmas tree has disappeared</p></div>
Human Teaser: शेफाली आणि कीर्ती कुल्हारी घेऊन येणार रहस्यमयी Web Series

वेळेवर नवीन खरेदी केला

मीरा पुढे लिहिते, "यावर्षी मी मुलांसाठी ख्रिसमस पार्टी आयोजित केली होती आणि या पार्टीचे मुख्य आकार्षण होते ते हे झाड. आम्ही घरभर शोधले पण बॉक्स सापडला नाही. नुकताच डेकोरेशन बॉक्स मिळाला. शेवटच्या क्षणी आणखी एक ख्रिसमस ट्री विकत घेतला. आणि हो मला ते फारसे आवडत नाही पण मुलांना ते सजवायला आवडते. आणि मुलांनी उत्तम प्रकारे हा ट्री सजवला आणि मी त्यांना थांबवले नाही. मला ते कुठेतरी सापडेल या आशेने, मी शेजारी आणि माझ्या आईला देखील विचारले की मी त्यांना ते ठेवण्यास सांगितले का? माझे बाबा राजपूत कुटुंबातील ब्लॅक होलचे लॉजिक देतात जिथे गोष्टी जादूने गायब होतात आणि पुन्हा कधीही सापडत नाहीत. मला वाटते माझ्या बाबतीतही असेच घडते आहे." अशी खंत व्यक्त करत मीराने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com