Akaay: 'अकाय'चा नेमका अर्थ काय? विराट-अनुष्काच्या मुलाचं अफलातून नाव

Akaay: १५ फेब्रुवारीला मुलगा झाला असून त्याचं नाव अकाय असं ठेवल्याचं त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
Virat Kohli-Anushka Sharma  Blessed with a Baby Boy Named Akaay
Virat Kohli-Anushka Sharma Blessed with a Baby Boy Named AkaayDainik Gomantak
Published on
Updated on

Akaay: बाळ जन्माला आलं की त्याला एक नाव दिले जाते आणि ते नाव त्याची ओळख बनते. त्यामुळचं नामकरण होत असताना त्या नावाचा अर्थ समजून घेतला जातो. एखादा व्यक्ती, वस्तू आणि प्राण्याला नाव देताना त्यापाठीमागे आपला काय विचार आहे, हे स्पष्ट होत असते. .

मात्र आता अचानक हा मुद्दा का उपस्थित होत आहे, असा अनेकांना प्रश्न पडला असेल. तर बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटचा किंग विराट कोहली या जोडप्यानं आपण दुसऱ्यांदा आई-वडील झाल्याची गुड न्यूज सोशल मिडियावर शेअर केली आहे. १५ फेब्रुवारीला मुलगा झाला असून त्याचं नाव अकाय असं ठेवल्याचं त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

आता अकाय नावाचा नेमका अर्थ काय? तर अकाय हा संस्कृत शब्द असून शरीराशिवाय असणारा म्हणजेच अकाय,आकार नसलेला निराकार असलेला म्हणजेच अकाय होय.दुसऱ्या बाजूला असंही म्हटले जात आहे. अकाय हे तुर्कीश नाव असून चमकणारा चंद्र ( Shining Moon ) असे या अकाय नावाचा अर्थ आहे.

अनुष्का आणि विराट या जोडप्यानं दिलेल्या गुडन्यूजनंतर चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. दरम्यान, याआधी विराट-अनुष्काने प्रेगनन्सीची बातम्या नाकारल्या होत्या. आता २० फेब्रुवारी २०२४ ला या जोडप्याने सोशल मिडियावर पोस्ट करत आपल्याला मुलगा झाल्याची बातमी चाहत्यांना सांगितली आहे.

विराट आणि अनुष्का यांना 2021 मध्ये पहिली मुलगी झाली होती. तिचे नाव त्यांनी वामिका ठेवले होते. आता तीन वर्षांनी वामिकाला भाऊ मिळाला आहे.

याबद्दल केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की 'खूप आनंदाने आणि प्रेमाने भरलेल्या हृदयाने तुम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की 15 फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या मुलाचे अकायचे आणि वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले आहे.'

'आम्हाला आमच्या आयुष्यातील या सुंदर क्षणात तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. आम्ही तुम्हाला विनंती करतो क तुम्ही या काळात आमच्या खाजगी आयुष्याचा आदर राखाल.'

विराट आणि अनुष्काच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या असून अनेकांनी त्यांना या गोड बातमीबद्दल शुभेच्छा दिल्या आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com