Manoj Bajpayee: बॉलीवूडमध्ये मनोज वाजपेयी म्हटले की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करणारा अभिनेता. मनोज वाजपेयी हा एक गुणी अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या भूमिका तो इतक्या जिंवतपणे रेखाटतो की मनोज वाजपेयी करत असलेल्या भूमिका प्रेक्षकांना आपल्या वाटल्याशिवाय राहत नाहीत.
आज त्यांचा 54 वा वाढदिवस. चला तर त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या आयुष्यातला एक खास किस्सा जाणून घेऊयात.
मनोज वाजपेयींचा जन्म बिहारमधील बेतिया या ठिकाणी 23 एप्रिल 1969 ला झाला होता. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाला पद्मश्री पुरस्काराने गौरवले गेले आहे. खूप कमी लोकांना त्यांच्या नावाचा एक किस्सा माहीत आहे ज्याचा उल्लेख त्यांची 'कुछ पाने की जिद' या बायोग्राफीमध्ये लेखक पियुष पांडे यांनी केला आहे.
मनोज असे नाव का ठेवण्यात आले
मनोज वाजपेयींचे नाव त्यांचे वडील राधाकांत वाजपेयी यांनी ठेवले होते. मनोज यांच्या जन्माच्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत मनोज कुमार यांचे चित्रपट हिट होते. त्यांच्या जन्माआधी राधाकांत वाजपेयींनी पुणे फिल्म इंस्टीट्यूटमध्ये प्रत्यक्षात मनोज कुमार यांना भेटले होते. राधाकांत वाजपेयी मनोज कुमार यांचे जबरदस्त चाहते होते. तर त्यांनी आपल्या मुलाचे नाव पण मनोज असेच ठेवले.
नाव बदलून समर असे ठेवायचे होते
मनोजने पुस्तकात एका ठिकाणी म्हटले आहे, मला माझे नाव बदलायचे होते. मी माझ्यासाठी समर या नवीन नावाचा विचार केला होता. थिएटरच्या जमान्यात नाव बदलण्याचा विचार केला तेव्हा सर्वांनी सांगितले की प्रतिज्ञापत्र करावे लागेल.
वर्तमानपत्रात जाहिरात द्यावी लागेल. ही सर्व कायदेशीर प्रक्रिया होती. त्यावेळी पैसे नव्हते त्यामुळे ही प्रक्रिया तेव्हा पुढे ढकलण्यात आली. मग मी विचार केला की, जेव्हा मी पैसे कमवेन , तेव्हा मी माझे नाव बदलेन.
मला 'बँडिट क्वीन'साठी पैसे मिळाल्यावर नाव बदलण्याचा विचार केला. पण मग माझा भाऊ म्हणाला की लोक तुझा पहिला चित्रपट मनोज वाजपेयी म्हणून पाहतील आणि नंतर दुसऱ्या नावाने पाहतील का?
राधाकांत वाजपेयींना जेव्हा कळाले की त्यांच्या मुलाला स्वत:चे नाव आवडत नाही. तेव्हा त्यांनी मनोज वाजपेयींना समजाऊन सांगितले की हे नाव बदलू नकोस मी खूप प्रेमाने ठेवले आहे. त्यानंतर मनोज वाजपेयींनी नाव बदलण्याचा विचार सोडून दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.