मलायका अरोराचा किलर लूक सोशल मिडियावर घालतोय धुमाकूळ

मलायकाने (Malaika Arora) स्वतःचा एक नवीन फोटो चाहत्यांसाठी सोशल मिडियावर (Social Media) शेअर केला आहे, जो चांगलाच व्हायरल होत आहे.
Malaika Arora
Malaika AroraDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवू़डमधील प्रसिध्द अभिनेत्री मलायका अरोरा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत असते. यातच तिच्या सोशल मिडिवरील प्रत्येक पोस्टला चांगली पसंती मिळते. मलायका चाहत्यांसाठी तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. यातच मलायकाने स्वतःचा एक नवीन फोटो चाहत्यांसाठी सोशल मिडियावर (Social Media) शेअर केला आहे, जो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मलायका अरोराचा (Malaika Arora) ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. (Malaika Arora Shared A Photo On Social Media)

दरम्यान, मलायका अरोराने तिचा ग्लॅमरस फोटो तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती सिल्व्हर कलरचा फ्रिल्स ड्रेस दिसत आहे. या फोटोमध्ये मलायका कंबरेवर हात ठेवून मागे वळून पाहत किलर पोज देत आहे. हा फोटो शेअर करत मलायकाने एक अतिशय मनोरंजक कॅप्शनही लिहिले आहे. पोस्ट शेअर करताना तिने "No turning back" म्हणजेच "मागे वळून पाहत नाही" असे कॅप्शन दिले आहे. मलायकाच्या पोस्टला 80 हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

Malaika Arora
हृतिक रोशन सबा आझादला करतोय डेट? गोव्यात केला होता Enjoy!

तसेच, मलायकाच्या या पोस्टला केवळ चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही लाइक करत आहेत. यावर ते 'स्टनिंग', 'गॉर्जियस' अशी कमेंट करत आहेत. पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही नेहमी चांगले दिसता'. विशेष म्हणजे मलायका अरोरा सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघे अनेकदा एकत्र फिरताना दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com