नेहरुंवर कविता केली म्हणून मजरूह सुलतानपुरी 2 वर्ष तुरूंगात होते

मुंबईत 1949 साली एका कामगार संपात मजरूह सुल्तानपुरी यांनी एक कविता ऐकवली. आणि ती कविता ऐकून नेहरू सरकार भडकले.
Majrooh Sultanpuri Jawaharlal Nehru
Majrooh Sultanpuri Jawaharlal NehruDainik Gomantak
Published on
Updated on

'मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर

लोग साथ आते गए और कारवां बनता गया'

मजरूह सुलतानपुरींचा हा शेर अनेक चाहत्यांच्या जिभेवर असतो. पण खर पाहिलं तर हा शेरच सुलतानपुरीवर अगदी अचूक बसतो. मजरूह सुलतानपुरी यांना लोक शायर, गझलकार, गीतकार म्हणून ओळखतात. पण, सुलतानपुरी होण्यापूर्वी ते असरुल हसन खान होते. ते व्यवसायाने हकीम होते. (Majrooh Sultanpuri Deth Anniversary)

एका कवितेमुळे पंडीत नेहरू यांना राग अनावर झाला होता

हकीमगिरी सोबतच त्यांची कवितेची आवड कायम राहिली आणि त्यांचा छंद भविष्यात त्यांचा रोजगारीचे साधन बनले. असररुल हसन खान यांचा छंद त्यांना मायानगरीत घेऊन गेला. अशा रीतीने हिंदी चित्रपटसृष्टीला एक उत्तम गीतकार लाभला, ज्यांनी वेदना, सुख, प्रेम आशा कित्यक भावनांना शब्दात मांडले. आजही लोक शांतता मिळवण्यासाठी त्यांच्या गाण्यांचा आधार घेतात.पण तुम्हाला माहित आहे का मजरूह यांच्या एका कवितेमुळे पंडीत नेहरू यांना राग अनावर झाला होता. चला तर जाणून घेवूया काय होती ती कविता...

हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध गीतकार आणि कवी मजरूह सुल्तानपुरी यांनी 'हमे तुमसे प्यार कितना', 'एक लडकी भीगी भागी सी', 'ओ मेरे दिल के चैन', 'चुरा लिया है तुमने जो दिल को' यांसारख्या सदाबहार गाण्यांनी संगीतप्रेमींची मनं जिंकली होती. सुल्तानपुरी यांनी चित्रपट क्षेत्रात गीतकार म्हणून खूप प्रसिद्धी आणि मोठे नाव कमावले. गीतकार असण्याबरोबरच ते एक उत्तम गझलकारही होते. आज मजरूह सुल्तानपुरी यांची 22 वी पुण्यतिथी आहे.

नशिबाने त्यांच्यासाठी काही तरी वेगळीच योजना आखली होती

नावाप्रमाणेच मजरूह सुलतानपुरी हे सुलतानपूरचे रहिवासी होते. पण, त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 रोजी निजामाबाद, आझमगड येथे झाला. त्याचे वडील पोलीस इन्स्पेक्टर होते आणि मुलाने इंग्रजी माध्यमात शिकावे अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळे सुलतानपुरी मदरशात दाखल झाले. त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या अरबी-पर्शियन भाषांचा विकास झाला. यानंतर ते लखनौला रवाना झाले आणि येथून त्यांनी युनानी औषधांचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. पण नशिबाने त्यांच्यासाठी काही तरी वेगळीच योजना आखली होती.

असा सुरू झाला चित्रपटात गाणी लिहिण्याचा प्रवास

हकीम म्हणून सुलतानपुरींचे काम फारसे जमत नव्हते. मात्र, या काळात त्यांची गझल आणि कविता यांची आवड नक्कीच पूर्ण होत होती. एका संध्याकाळी सुलतानपूरच्या मुशायरात त्यांनी गझल पाठ केली. त्यांच्या गझलेचा तिथे बसलेल्या सर्वांवर प्रभाव पाडला. लोक चर्चा करू लागले की नवीन कवी आला आहे. सुलतानपुरींची गझलची आवड हळूहळू वाढत गेली. या दरम्यान मुंबईत 1945 साली झालेल्या मुशायराच्या वेळी चित्रपट निर्माते ए.आर. कारदार यांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांना चित्रपटात लेखन करण्यास संधी दिली. यानंतर मजरूह यांनी 1946 मध्ये ‘शाहजहाँ’ चित्रपटासाठी गाणी लिहिली. आणि तेव्हापासूनच बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी लिहिण्यास सुरुवात केली.

सुल्तानपुरी यांची कविता ऐकून नेहरू सरकार भडकले

मुंबईत मजरूह यांचा चाहता वर्ग वाढत गेला. तो काळ स्वातंत्र्य लढ्याचा होता. नुकतेच देशाला स्वातंत्र्य मिळून दोन वर्ष झाले होते. आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू होते. दरम्यान मुंबईत 1949 साली एका कामगार संपात मजरूह सुल्तानपुरी यांनी एक कविता ऐकवली. आणि ती कविता ऐकून नेहरू सरकार भडकले. परिणामी तत्कालीन गव्हर्नर मोरारजी देसाई यांनी मजरूह सुल्तानपुरी यांना आर्थर रोड तुरुंगात टाकले. मजरूह सुल्तानपुरी यांनी केलेल्या कवितेबद्दल माफी मागण्यास सांगण्यात आले होते, पण त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे मजरूह सुल्तानपुरी यांना दोन वर्षे तुरुंगात राहावे लागले होते.

ही होती ती कविता...

मन में ज़हर डॉलर के बसा के,

फिरती है भारत की अहिंसा।

खादी की केंचुल को पहनकर,

ये केंचुल लहराने न पाए।

ये भी है हिटलर का चेला,

मार लो साथी जाने न पाए।

कॉमनवेल्थ का दास है नेहरू,

मार लो साथी जाने न पाए।

Majrooh Sultanpuri Jawaharlal Nehru
Happy Birthday Mohanlal: साऊथ सुपरस्टार मोहनलाल चित्रपटात येण्यापूर्वी होता रेसलर

तुरुंगातही केली अजरामर गीतांची रचना

आर्थर रोड तुरुंगात टाकल्यानंतर त्या शिक्षेदरम्यान मजरूह यांना मुलगी झाली. या काळात त्यांचे कुटुंब आर्थिक संकटातून जाऊ लागले. कारण घरातील कमावती व्यक्ती तुरूंगात होती. त्यामुळे मजरूह साहेब यांनी तुरुंगातूनच काही चित्रपटांसाठी गाणी लिहायला सुरुवात केली. आणि त्यांच्या कुटूंबियांना आधार मिळाला. 1951-52 या काळात मजरूह तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आले आणि तेव्हापासून 2000 सालापर्यंत त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत चित्रपटासाठी गीणी लिहिली. अखेर 24 मे 2000 रोजी या महान गीतकाराचे मुंबईत निधन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com