Madhuri Dixit: गोव्याच्या किनाऱ्यावरून धक धक गर्लने शेअर केले सुंदर फोटो

माधुरी दीक्षित गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
Madhuri Dixit| goa
Madhuri Dixit| goa Instagram
Published on
Updated on

बॉलिवुडमधील धक धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. चित्रपटसृष्टिमध्ये तिने आपल्या अभिनय, डान्स आणि स्टाइलने सर्वांना मोहात पाडले आहे.ती सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते. अलीकडेच तिने सोशल मिडियावर आपले लेटेस्ट फोटो (Photo) शेअर केले आहेत. (Madhuri Dixit is enjoying tropical vibes in Goa)

माधुरी दीक्षितने इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. हे फोटो गोव्यातील (Goa) आहे. माधुरी सध्या गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ती या फोटोमध्ये नारळ पाणी पितांना दिसत आहे.

जेव्हा जेव्हा माधुरीला आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ मिळतो तेव्हा ती सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी फिरायला जाते. यावेळी ती गोव्याच्या किनाऱ्यावर (Goa Beach) सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आली आहे. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) चकोते ग्रुपच्या ग्रैंड अँबेसिडर झाली आहे. चकोते ग्रुपच्या आजवरच्या थक्क करणाऱ्या प्रवासाने मी खुप प्रभावित झाले आहे. मला खाद्यसंस्कृतीविषयी मुळातच आवड असल्याने मी त्यांच्या उत्पादनाकडे नेहमीच आकर्षित झाले आहे, असे माधुरीने यावेळी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com