लता दीदी गाणार होत्या 'द काश्मीर फाईल्स'मध्ये एक गाणं; दिग्दर्शक म्हणाले..

त्यांच्या निधनामुळे ही गोष्ट शक्य होऊ शकली नाही; विवेक अग्निहोत्री
Lata Mangeshkar
Lata Mangeshkar Dainik Gomantak

Lata Didi Song in The Kashmir Files: सध्या सगळीकडे गाजत असणारा काश्मिरी पंडितांवर आधारित 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतला आहे. सर्वच स्तरातून या चित्रपटाचे कौतुक होत आहे. यावरून राजकारणही चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे.

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) जादू केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचेही खूप कौतुक केले जात आहे. अनेक राज्यांमध्ये चित्रपट 'टॅक्स फ्री' देखील करण्यात आला आहे. चित्रपटाने अगदी मोजक्याच दिवसात उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. (Lata Didi was going to sing a song in The Kashmir Files movie says vivek agnihotri)

Lata Mangeshkar
IPLमध्ये कॉमेंट्री करणाऱ्यांना दिलं जाणारं मानधन ऐकून व्हाल थक्क!

असे असले तरी चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना मात्र एका गोष्टीचे दु:ख असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या या चित्रपटात दिवंगत भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) एक गाणे गाणार होत्या. पण त्यांच्या निधनामुळे ही गोष्ट शक्य होऊ शकली नाही. आणि याच गोष्टीचे दुख विवेक यांनी व्यक्त केले आहे.

चित्रपटात गाणे गाण्यासाठी लता दीदी तयार होत्या, अशी माहिती विवेक यांनी दिली. "चित्रपटाची कथा लक्षात घेता त्यात कोणतेही गाणे ठेवण्याची गरज आम्हाला वाटत नव्हती. मात्र तरीही चित्रपटात एक लोकसंगीत ठेवण्याचा निर्णय आम्ही केला होता. लता मंगेशकर यांच्या आवाजात गाणे रेकॉर्ड केले जावे अशी आमची इच्छा होती. याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी होकारही दिला होता. पण ते शक्य होऊ शकले नाही. याचे अत्यंत दु:ख आहे, असे विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com